ब्राम्हणगाव भांड सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्राम्हणगाव भांड सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील प्रगतीपथावर असलेल्या ब्राम्हणगाव भांड सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील प्रगतीपथावर असलेल्या ब्राम्हणगाव भांड सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन गोवर्धन मुसमाडे याच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


यावेळी संस्थेचे मुख्य सचिव किरण कोळसे यांनी यांनी सन २०२१-२२ सालाची वार्षिक हिशोब पत्रके, ताळेबंद, नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. संस्थेच्या, सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा होऊन संस्थेने यावेळी १५ टक्के लाभांश जाहीर करून चढत्या क्रमाने डिव्हीडंड  देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. १५ टक्के लाभांश देणारी राहुरी तालुक्यातील एकमेव संस्था आहे. सभासदांनी वेळेवर कर्ज भरल्यास सभासदांच्या अनेक विकासाच्या योजना केल्या जातील, असे संस्थेचे चेअरमन गोवर्धन मुसमाडे यांनी सांगितले.


यावेळी डॉ. तनपुरे सह. साखर कारखान्याचे माजी संचालक रमेशराव वारुळे यांनी संस्थेचा विकास व गावच्या एकोप्यावर समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यमान सरपंच डॉ. दत्तात्रय वारुळे, शिवाजी गोसावी, बाबासाहेब काळे यांनी मार्गदर्शन केले.


सभेस व्हा. चेअरमन ज्ञानदेव काळे, पोलीस पाटील एकनाथ काळे, सदस्य पंढरीनाथ शिंदे,  सोमनाथ गायकवाड, नामदेव आडसुळ, शिवाजीराव वारूळे, रोहिदास भांड, संजय देवकर, राजेंद्र साळवे, बेबीताई काळे, विजया गोसावी, उपसरपंच सुनील देवकर, विलास काळे, अॅड. इंद्रभान काळे, गौतम गायकवाड, चक्रनारायण, राजेंद्र प्रशांत शिंदे, प्रल्हाद भांड, रमेशराव म्हसे, सुरेश देवकर, सुभाषराव वारुळे, राजेंद्र काळे, अशोक काळे, विनय काळे, नानासाहेब भांड, बापूसाहेब काळे, माजी शामराव वारुळे, बबनराव लाळगे सेल्समन यांचेसह सभासद उपस्थित होते. व्हा. चेअरमन ज्ञानदेव काळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत