देवळाली प्रवरात अल्पवयीन तरुणीची छेडछाड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अल्पवयीन तरुणीची छेडछाड

देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना आज सकाळी देवळाली प्रवरा शह...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना आज सकाळी देवळाली प्रवरा शहरात घडली असून स्थानिक नागरिकांनी छेडछाड करणाऱ्या तिघांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत सदर पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात श्रीरामपूर तालुक्यातील तिघांसह अन्य एका अनोळखी विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




देवळाली प्रवरा परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची  इच्छा नसतांनाही तीचा वेळोवेळी पाटलाग करून इरफान नामक आरोपीने याने मला तु खुप आवडतेस मला तुझयाशी लग्न करावयाचे आहे तु मला होकार दे नाहीतर मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी दिली आहे तसेच आज सकाळी १० वाजेच्या  सुमारास सदर अल्पवयीन तरुणी देवळाली प्रवरा गावातील निलकमल बेकरी येथे पेस्ट्री घेण्याकरीता थांबले असता तेथे 

इरफान ,अजिंक्य , जुनेद (सर्व रा.महांकाळ वडगांव ता श्रीरामपुर जि अहमदनगर) व अन्य एक अनोळखी व्यक्ती तिच्या जवळ आले व इरफान याने अल्पवयीन तरुणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य  करुन म्हणाला की, तु जर आज मला होकार दिला नाहीस तर मी तुला उचलुन घेवुन जाईल.  याचवेळी अजिंक्य व अनोळखी एकाने सदर अल्पवयीन तरुणीस म्हणाला की,  तु इरफानला होकार दे तो आमचा मित्र आहे तु त्याला होकार नाही दिला तर आम्ही तुला मारून टाकु अशी धमकी दिली तेव्हा फिर्यादीने आरडा ओरडा केला असता त्यावेळी स्थानिक नागरिक जमा झाले असता यातील तिघांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले तर अनोळखी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.


 या घटनेचा आधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत