शिक्षक बॅंक निवडणूक निर्णायक वळणावर; गुरूकुल मंडळाला धक्का.... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षक बॅंक निवडणूक निर्णायक वळणावर; गुरूकुल मंडळाला धक्का....

  स्वराज्यचा गुरूमाऊलीला पाठिंबा- जिल्हाध्यक्ष नाबगे       नगर : वेबटीम    अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक व विकास मंडळ या जिल्ह्...

 स्वराज्यचा गुरूमाऊलीला पाठिंबा- जिल्हाध्यक्ष नाबगे

      नगर : वेबटीम


   अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक व विकास मंडळ या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या संस्थांची निवडणूक सध्या सुरू आहे. शासन आदेशाने अर्ध्यावर थांबलेली शिक्षक बॅंकेची निवडणूक प्रक्रिया हायकोर्टाच्या आदेशाने पुन्हा सुरू झाली असून प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत विक्रमी उमेदवार आणि शिक्षक मंडळे उतरली आहेत. छोटी मंडळे मोठ्या मंडळांशी आघाडी करून आपली ताकद आजमावत आहेत. 

       जुनी पेन्शन हक्क (DCPS) संटनेने स्वराज्य मंडळाच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उतरविण्याचा निर्णय जाहीर केलेला होता. परंतू स्वराज्य मंडळाच्या काही संधीसाधू नेत्यांनी यापूर्वी शिक्षक बॅंकेत  केलेल्या अंदाधुंद व भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यात बदनाम झालेल्या गुरूकुल मंडळाबरोबर साटेलोटे करून आपल्या उमेदवाऱ्या पदरात पाडून घेतल्या. वास्तविक हा अभद्र आघाडीचा निर्णय स्वराज्य मंडळातील अनेक तरूण, सूज्ञ व विचारी सभासदांना पटलेला नव्हता. परंतु DCPS बांधवांमध्ये फूट पडायला नको म्हणून आम्ही शांततेची भूमिका घेतली होती. गेल्या आठवड्यात स्वराज्य मंडळाशी सूतराम संबंध नसलेल्या संजय कळमकर यांनी स्वराज्य मंडळाचा जिल्हा अध्यक्ष बदलाला असल्याचे फोटो सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. स्वराज्य मंडळात या बाह्य हस्तक्षेपामुळे असंतोष निर्माण झाला. यापूर्वी गुरूकुलने ऐक्य मंडळाला बॅंकेत बरोबर घेऊन कसे संपविले हे सर्व जिल्ह्याने पाहिलेले आहे. 

     बजाज अलाएन्ज, शाखा जागा खरेदी, संगणक खरेदी, १००%सी.डी.रेशो, रिझर्व्ह बँकेने गैरकारभारामुळे केलेला अडीच कोटींचा दंड या सर्व घोटाळ्यांमुळे   सभासदांनी नाकारलेल्या गुरूकुल मंडळाबरोबरची अनैतिक आघाडी मान्य नसल्याचे स्वराज्य मंडळाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. स्वराज्य मंडळाच्या अनेक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क करून गुरूकुल बरोबर जाण्याच्या निर्णयावर फेरविचार करून योग्य मंडळाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली होती.

       त्यानुसार शिक्षक बॅंकेत गेल्या पंचवीस वर्षांत झाला नाही असा सभासदाभिमुख कारभार शिक्षक नेते श्री. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने करून नवा आदर्श निर्माण केला आहे. बापूसाहेब तांबे हेच भविष्यात सभासदांच्या कामधेनूला उत्कृष्टपणे चालवून सभासद हिताची जपणूक करू शकतात; असा आम्हाला ठाम विश्वास वाटत असल्याने मी स्वराज्य मंडळाचा नोंदणीकृत अध्यक्ष श्री. सचिन नाबगे स्वराज्य मंडळाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांसह शिक्षक बॅंक व विकास मंडळ निवडणुकीत श्री.बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरूमाऊली मंडळ (२०१५), ऐक्य मंडळ, शिक्षक भारती, शिक्षक एकलमंच या आघाडीला स्वराज्य शिक्षक मंडळाचा पाठींबा जाहीर करत आहे.

     यापूढील कालावधीत निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून गुरूकुल मंडळाचा काळा कारभार पुराव्यानिशी जिल्ह्यातील सभासदांसमोर मांडून गुरूकुल मंडळाला पराभूत करून शिक्षक बॅंक आगामी काळात श्री. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या ताब्यात देण्याचे आवाहन करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत