शेतातून चारा घेऊन जाणाऱ्या महिलेचे गंठण धूमस्टाईल लांबविले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतातून चारा घेऊन जाणाऱ्या महिलेचे गंठण धूमस्टाईल लांबविले

  देवळाली प्रवरा(वेबटीम) शेतामधून चारा घेवून पायी चाललेल्या महिलेच्या गळयातील गंठन धूम स्टाईलने ओढून नेण्याची घटना देवळाली प्रवरा ते शेटेवाड...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



शेतामधून चारा घेवून पायी चाललेल्या महिलेच्या गळयातील गंठन धूम स्टाईलने ओढून नेण्याची घटना देवळाली प्रवरा ते शेटेवाडी रोडवर घडली आहे.



याबाबत सौ.ज्योती नवनाथ कराळे, रा. देवळाली प्रवरा, धंदा- घरकाम व शेती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. देवळाली प्रवरा ते शेटेवाडी रोडने  गावाच्या शिवारातील शेतामधून चारा घेवून पायी रस्त्याने येत असताना पाठीमागून एका काळया रंगाच्या लाल पट्टा असणाऱ्या बजाज डिस्कव्हर गाडीवरून आलेल्या ३ अनोळखी इसमांनी वेगात मोटार सायकलवर येवून आपल्या गळयातील २० हजार रू. किंमतीचे ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेवून धक्का देवून हे गंठनचोर राहुरीच्या दिशेने निघून गेले. सौ. ज्योती कराळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात अज्ञात तिघा गंठन, चोरांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुरनं. ९६९/ २०२२ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्जन नार्हेडा हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत