राहुरी(वेबटीम):- शिवतेज ग्रुप आयोजित नवरात्र उत्सव २०२२ परिसरातील सर्व माता-भगिनी,भवानी भक्त,बालगोपाळ, देणगीदार,प्रायोजक या सर्वांच्या सक्...
राहुरी(वेबटीम):-
शिवतेज ग्रुप आयोजित नवरात्र उत्सव २०२२ परिसरातील सर्व माता-भगिनी,भवानी भक्त,बालगोपाळ, देणगीदार,प्रायोजक या सर्वांच्या सक्रिय सहभागाने व आनंदाने पार पडला.नऊ दिवस उपवास-व्रत,आरती,भजन-होमहवन व विविध सांस्कृतिक उपक्रमाने हा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला गेला.
विशेष आकर्षणपर अहमदनगर येथील आकाश डान्स स्टुडिओ प्रस्तुत "नृत्य जल्लोष",महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सिनेअभिनेते श्री.राजेश मंचरे प्रस्तुत होमिनिस्टर,श्री.अजिंक्य गायकवाड प्रस्तुत श्री स्वामी स्वरांजली वाद्यवृंद ऑर्केष्ट्रा,बालगायक जयेश खरे याचा सन्मान व गीतगायन,राहुरी सत्या ग्रुप प्रस्तुत भव्य दांडिया या कार्यक्रमांनी उत्सवाची शोभा वाढवली.तसेच नऊ दिवस रसिकांनी रात्रभर दांडियाचा मनमुराद आनंद घेतला.कार्यक्रमांच्या प्रसिद्धीचे सहकार्य सार्वमंथनचे पत्रकार व मंडळाचे सदस्य अशपाक सय्यद,आवाज जनतेचे श्री.श्रीकांत जाधव व ऋषि राऊत यांनी केले.
या उत्सवाच्या पूर्णतेसाठी मंडळाचे संस्थापक श्री.सुरेश लोखंडे,अध्यक्ष श्री. बाळासाहेब लोखंडे,उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब आढाव,गजानन घुगरकर,अजय खिलारी,संदीप महाडीक,शशी खाडे तसेच नियोजन व व्यवस्थापन समितीचे श्री.अमित देशमुख, गोविंद खवडे,सौरभ लोखंडे,विजय लोंढे,ज्ञानेश्वर पवार,कैलास पवळ,मयूर लोखंडे,सिद्धार्थ लोखंडे,सचिन लोखंडे,आकाश चाबुकस्वार यांनी महत्वाची भूमिका बजावली.दरमहा वर्गणी देणारे 30 सदस्य यांचे योगदान दिशा देणारे ठरले.तसेच अमोल वाकचौरे,विलास पवळ, वैभव गाडे,हसन सय्यद,अविनाश लांडगे,संदीप मुसमाडे,महादेव रायते,विकी मुंढे,गणपत गव्हाणे,बाबाजी जगधने, अतुल त्रिभुवन,दत्ता खांदे,सोमा कीर्तने,राजू लांडगे,योगेश मुसमाडे,व सर्व सदस्य आणि छोटे शिवतेज ग्रुप व कॉलनीतील सर्व माता-भगिनी या सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले.
नवरात्र उत्सव सांगता करताना देवी तुळजाभवानी मातेची घोषणा देऊन रोगराईचे उच्चाटन होऊ दे! अशी प्रार्थना करण्यात आली.व अलगद सर्वांचे डोळे पाणावले.
पुढील २५ वे वर्ष नाविन्यपूर्ण होणार असा निर्धार करून सर्वांचे आभार मानण्यात आले.तसेच आज कोजागिरी पौर्णिमा निमित्त दुपारी ४ वाजता रांगोळी व रात्री ९ वाजता मिनी होमिनिस्टर चे देखील आयोजन केले आहे..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत