चिंचविहिरेत विवाहित तरुणीच्या घरात घुसून विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरेत विवाहित तरुणीच्या घरात घुसून विनयभंग

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचवीहिरे परीसरातील ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून,लथाबुक्यांनी मारहाण करत,शिव...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील चिंचवीहिरे परीसरातील ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून,लथाबुक्यांनी मारहाण करत,शिवीगाळ करत जीवेमारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ३० वर्षीय विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,अभिषेक तुकाराम नालकर व काही तरुण मूल मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याने मी त्यांना आरडाओरडा करू नका असे म्हणाल्याने अभिषेक नालकर याने माझ्या घरात घुसून अंगाशी झटापट करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच मला लथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात भांदवि कलम ३५४,४५२,५०४,५०६ प्रमाणे अभिषेक तुकाराम नालकर राहणार चिंचवीहिरे ता.राहुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.एन.गर्जे हे करत आहेत.



दरम्यान राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस छेडछाड, विनयभंगाच्या घटना वाढत असतानाच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी छेडछाड, विनयभंगाबाबत तक्रारी असल्यास न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केल्यामुळे याबाबत गुन्हे दाखल होऊन रोडरोमिओं,टवाळखोरांना आळा बसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत