नांदेड जिल्ह्यातील खुन करून पसार झालेली टोळी श्रीगोंदा येथे जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नांदेड जिल्ह्यातील खुन करून पसार झालेली टोळी श्रीगोंदा येथे जेरबंद

नगर विशेष प्रतिनिधी दि. 26/10/2022 रोजी रात्री 10 वा.चे सुमारास फिर्यदी नामे ईरवंत धोंडीबा धोंडापुरे यांचा मुलगा नामे मन्मथ इरवंत धोंडापुरे ...

नगर विशेष प्रतिनिधी



दि. 26/10/2022 रोजी रात्री 10 वा.चे सुमारास फिर्यदी नामे ईरवंत धोंडीबा धोंडापुरे यांचा मुलगा नामे मन्मथ इरवंत धोंडापुरे याचा धारदार शस्त्राने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला होता व सदरचा मृतदेह एका शेतात फेकून देऊन पुरावा नष्ट केला होता त्यानुसार कुंडलवाडी पो स्टे येथे  गु.र नं 119/2022 भा.द.वी.कलम 302,201,143,147,148,149 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी  हे  खून करून अहमदनगर जिल्ह्यातून रेल्वेने पळून जात असल्याबाबत ची माहिती धर्माबाद चे 𝙳𝚢𝚜𝚙 विक्रांत गायकवाड यांनी श्रीरामपूरचे 𝙳𝚢𝚜𝚙 संदीप मिटके यांना दिली त्यानुसार त्यांनी तात्काळ नगर शहरापासून पुढे श्रीगोंदा, बेलवंडी रेल्वे स्टेशन येथे टीम रवाना करून आरोपी नामे 1) सचिन विश्वनाथ खंडगावे 2)दत्तप्रसाद बालाजी ढगे 3)रवी धोंडीबा ढगे 4)कृष्णा दत्ताराम ढगे 5)बालाजी शिवाजी ढगे ,सर्व राहणार चिरली ता बिलोली जि नांदेड यांना श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

          सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली 𝙳𝚢𝚜𝚙  अण्णासाहेब जाधव,Dysp संदीप मिटके , 𝙰𝚙𝚒 महेश जानकर, 𝙿𝚜𝚒समीर अभंग, 𝙰𝚜𝚒विठ्ठल बडे, 𝙰𝚜𝚒मनोहर गावडे, 𝙰𝚜𝚒 राजेंद्र आरोळे,𝙷𝚌 मुकेश कुमार बडे, 𝙿𝙽 विकास वैराळ,𝙿𝙽 भरत खारतोडे, 𝙿𝚌 संभाजी गर्जे,𝙿𝚌 दादासाहेब टाके,𝙿𝚌 किरण बोराडे,𝙿𝚌 विनायक जाधव 𝙿𝚌 योगेश सुपेकर,𝙿𝚌 राजु भोर,𝙿𝚌 संभाजी घोडे 𝙿𝚌 दादाराव म्हस्के  𝙿𝚌 नितीन शिरसाठ यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत