राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शाहमद शब्बीर शेख यांच्यावर ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शाहमद शब्बीर शेख यांच्यावर ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ तक्रारदार- पुरुष वय- ३२,रा -मुलनमाथा, ता- राहुरी, जि.अहमदनगर
▶️ आरोपी - .शाहमद शब्बीर शेख, पोलीस नाईक/१५६७, राहुरी पोलीस स्टेशन जि. अहमदनगर
▶️ लाचेची मागणी- ५,०००/-₹ तडजोड अंती ₹ ४,०००/-
▶️ लाचेची मागणी - ता.१३/१०/२०२२
▶️ लाचेचे कारण - तक्रारदार यांचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल असून सदर अदखलपात्र गुह्यात तक्रारदार यांचे वर तहसिल कार्यालय, राहुरी येथे चॉप्टर केस करण्यात आली असून, सदर चॉप्टर केस मध्ये मदत केल्याचे मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे दि.१३/१०/२०२२ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन येथे पंच साक्षीदार समक्ष तड़जोड अंती ४०००/- ₹ ची मागणी केली.म्हणून आज रोजी आरोपी लोकसेवक यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ सापळा अधिकारी:- गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
▶️ पर्यवेक्षण अधिकारी- हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶ सहायक सापळा अधिकारी:- शरद गोरडे
पो नि.ला.प्र.वि.अहमदनगर
सापळा पथक - पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगुल, पोना रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख, राहुल डोळसे.
▶ मार्गदर्शक-मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी - मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर






कोणत्याही टिप्पण्या नाहीत