राहुरी तालुक्यातील 'या' गावात विवाहित तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील 'या' गावात विवाहित तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

राहुरी(वेबटीम) तीन दिवसापासून घरातून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील विवाहित तरुणीचा शेताजवळील विहिरीत मृतदेह आढळल्या...

राहुरी(वेबटीम)


तीन दिवसापासून घरातून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील विवाहित तरुणीचा शेताजवळील विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.



 पिंप्री अवघड येथील भारती राजू सोडनर ही २४ वर्षीय  विवाहित तरुणी गेल्या तीन दिवसांपूर्वी घरात झालेल्या  वादामुळे पहाटच्या सुमारास रागाने निघून गेली होती. 





आज दुपारी सदर विवाहित तरुणीचा मृतदेह त्यांच्याच शेताजवळ असलेल्या विहिरीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी राहूरी येथे पाठविला आहे.



घटनास्थळी विवाहीत तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी धाव घेतली असून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत