लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २५ ऑक्टोबरला सूर्य ग्रहण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २५ ऑक्टोबरला सूर्य ग्रहण

*ग्रहणा विषयी माहिती* मंगळवार दि. 25.10.2022 रोजी ग्रहण आहे.यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपू...

*ग्रहणा विषयी माहिती*



मंगळवार दि. 25.10.2022 रोजी ग्रहण आहे.यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबर रोजी असून ग्रहण २५ ऑक्टोबर आहे . त्यामुळे लक्ष्मीपूजन साठी ग्रहणाची कोणतीही अडकाठी नाही . कारण लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसरे दिवशी ग्रहण आहे व ग्रहणाचे दुसरे दिवशी बलिप्रतिपदा आहे . त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधीसाठी , पूजेसाठी कोणतीही अडचण नाही.


*ग्रहण माहिती*


 यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर , मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात  दिसणार आहे . हे सूर्यग्रहण भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल . त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही . म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .

*ग्रहणाचा स्पर्श :-* दुपारी १६:४९

*ग्रहण मध्य :-* दु .१७:४३

*ग्रहण मोक्ष ( सूर्यास्त ) :-* संध्याकाळी १८:०८ 

*ग्रहणाचा पर्वकाल* :- १ तास १९ मिनिटे राहील .

*ग्रहणाचे वेध*


ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून लागणार असून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामधे भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध इत्यादी करता येईल . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ पर्यंत पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र ही कर्मे करू नयेत.ग्रहण संपल्या नंतर आंघोळ करून त्या नंतर जेवण करावे.

*ग्रहणातील कृती*

ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे , पर्व काळामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण  ग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे . अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .


*ग्रहणाचे फळ*

 ऋषभ , सिंह , धनु , मकर या राशींना शुभ फल 

मेष , मिथुन , कन्या , कुंभ या राशींना मित्रफल 

कर्क , तुला , वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे .

ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .


काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा. 

श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालय

*दिनेश विजय जोशी ( गुरू )

*8055424219*

*9096221631*





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत