सात्रळ (वेबटीम) आम जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी तसेच सामाजिक जाणिवेची जवाबदारी पूर्ण करण्याच्या द्रिष्टीने राज्य शासनाकडून आलेले ...
सात्रळ (वेबटीम)
आम जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी तसेच सामाजिक जाणिवेची जवाबदारी पूर्ण करण्याच्या द्रिष्टीने राज्य शासनाकडून आलेले "आनंदाचा शिधा "चे वाटपाचा सात्रळ येथील शुभारंभ विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांच्या शुभहस्ते तसेच सात्रळ ग्रुप सोसायटी च्या संचालक मंडळाच्या उपस्तितीत पार पडला. सात्रळ ग्रुप सोसायटी तर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात हा कार्यक्रम पार पडला.
राज्य सरकार कडून फक्त शंभर रुपयात मिळणाऱ्या या "आनंदाचा शिधा " त साखर, डाळ, रवा व तेल मिळत असून सर्वसामान्य नागरिक सणासुदीला मिळालेल्या या मदतीमुळे राज्य सरकारला धन्यवाद देतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रसंगी सात्रळ चे उपसरपंच बाळासाहेब पवार, सात्रळ ग्रुप सोसायटी चे उपाध्यक्ष अतुल ताठे, संचालक दिलीपराव डुक्रे, वसंतराव पाटील, सुभाष दिघे, विलासराव घोलप, गोरक्ष घोलप, संजय नागरे, प्रकाश ताठे, मंदाकिनी दिलीप पाटील, उज्ज्वला विजय डुक्रे, चांगदेव पडघलमल, तुळशीराम शिंदे, सुभाष चोरमुंगे, सचिव दिलीप म्हैसेकर, सेल्समन विनोद कुलकर्णी, तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तिथ होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत