देवळाली प्रवरात शनिवारी प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात शनिवारी प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान

देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डि. एम.सी दूध संकलन व शीतकरण केंद्राच्यावतीने शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डि. एम.सी दूध संकलन व शीतकरण केंद्राच्यावतीने शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दूध उत्पादकांना अनामत रक्कम व ठेव-रिबेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.

 देवळाली शहरातील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे डि. एम.सी उद्योग समूहाच्यावतीने माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते अनामत रक्कम व रिबेट-ठेव वाटप केली जाणार आहे. यानिमित्ताने प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास  माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशव शिंदे, राहुरी तालुका दूध संघाचे चेअरमन तान्हाजीराव धसाळ, तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, प्रियदर्शनी उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण फलके, देवळाली सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, माजी चेअरमन सुमुल डेअरीचे महाराष्ट्र व्यवस्थापक विवेकसिंग सर,सुमुल डेअरीचे एरिया मॅनेजर विनोद महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमास व व्याख्यानासाठी शेतकरी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डि. एम.सी उद्योग समूहाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, दूध उत्पादक सभासद व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत