राहुरी(वेबटीम) नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. नाशिक विभाग ...
राहुरी(वेबटीम)
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी सुरू आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या तयारी अंतर्गत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विजय मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट घेत नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातमोठे काम असलेले श्रीरामपूर येथील डॉ. मॅक त्रिभुवन यांना मिळावी अशी मागणी केली.
५४ तालुके व ५ जिल्ह्याचा विस्तीर्ण असा नाशिक पदवीधर मतदारसंघ आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले डॉक्टर विजय मकासरे यांनी दोन वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत सत्ताधाऱ्यांपुढे मोठ्या आव्हान निर्माण केले आहे. मकासरे यांचा पदवीधर मतदार संघामध्ये मोठा जनसंपर्क असल्यामुळे त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळणार त्यामुळे यंदाची निवडणूक विद्यमान आमदार असलेले डॉ. सुधीर तांबे यांना जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी नाशिक पदवीधर निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार असल्याची माहिती विजय मकासरे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याशी पाऊण तास झालेल्या चर्चेतून डॉ.मॅक त्रिभुवन यांच्या उमेदवारीबद्दल बाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या काही दिवसातच पक्षप्रमुख अँड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारीची बाबत मागणी करणार आहोत अशी माहिती यावेळी मकासरे यांनी माध्यमांना दिली. पक्षाने उमेदवारी दिल्यास अहमदनगर जिल्हा निरीक्षक सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे महिला जिल्हाध्यक्ष वर्षा भास्कर जिल्हा महासचिव अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार असल्याचे डॉ मॅक त्रिभुवन यांनी सांगितले..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत