राहुरीत छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवा – मराठा एकीकरण समिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवा – मराठा एकीकरण समिती

राहुरी प्रतिनिधी शुक्रवार दि.१४ रोजी मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे व राहुरी नगर परिषदेकडे ...

राहुरी प्रतिनिधी



शुक्रवार दि.१४ रोजी मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे व राहुरी नगर परिषदेकडे पत्र देवून राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा व राहुरी शहरात मराठा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.



मराठा एकीकरण समितीचे शेकडो सदस्य विविध मागण्यांचे निवेदन घेवून दु.१२ वाजे दरम्यान आ.प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात धडकले.परंतु आ.तनपुरे हे त्यांच्या कार्यालयात व्यस्त असल्याने समितीच्या सदस्यांनी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज कि जय, एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी सुरु केल्यामुळे स्वतः आ.तनपुरे यांनी कार्यालयाच्या बाहेर येत मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे मागण्या मांडतांना म्हणाले कि राहुरी शहराच्या बाजूला शिर्डी व शिंगणापूर हे प्रख्यात देवस्थान आहेत.देश विदेशातून येणारे भाविक-पर्यटक हे आपल्या राहुरी शहरातून प्रवास करत असतात,आपल्या राहुरी शहरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नाही. त्याच अनुंशघाने राहुरी नगर परिषदेने सुधारित पाणीपुरवठा योजने अंतर्गत नविन पाण्याची टाकी मुथा प्लॉट,डॉ.दादासाहेब तनपुरे मार्गावर बांधलेली आहे.जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी निष्कासित करणे अनिवार्य झालेली आहे. त्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी केली. तसेच राहुरी शहरात मराठा भवन बांधण्यासाठी राहुरी शहरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.मराठा भवन मध्ये वाचनालय,ग्रंथालय,शासकीय योजनांचे अद्यवत सेंटर,तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

राहुरी नगरपरिषदेला देखील याच आशयाचे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी राजेंद्र लबडे,सतीष घुले,किरण कडू,विराज धसाळ,सचिन म्हसे,रमेश पा.म्हसे,निखील कोहकडे,दिनेश झावरे,सतीष चोथे,लक्ष्मण पटारे,सतीष ढोकणे,सुभाष जुंदरे,जनार्धन तारडे,सुनिल निमसे,कांता तनपुरे,सचिन चौधरी,सचिन बोरुडे,कावरे भाऊराव,आबासाहेब शेटे,शिवाजी थोरात,शिवाजी थोरात,रोहित नालकर,नितीन कल्हअपुरे,अनिल आढाव,विक्रांत कडू,संदीप गीते,रोहित नालकर,अविनाश क्षीरसागर,विक्रम मोढे,विनायक बाठे,विक्रम गाढे,संदीप कवाने,दिपक पवार,सागर ताकटे,अमोल वाळूंज,दिघे आदिनाथ,रविंद्र कदम,अनिल निमसे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत