राहुरी/वेबटीम:- राहुरी न्यायालयात राहुरी तालुका बार असोसिएशन व राहुरी तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी न्यायालयात राहुरी तालुका बार असोसिएशन व राहुरी तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या पाहुणे म्हणून सह न्यायाधीश सौ रूपाली तपाडिया मॅडम व सह न्यायाधीश सौ पुनम बिडकर मॅडम या होत्या.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA,) या विषयावर ॲड.मच्छिंद्र देशमुख यांनी माहिती दिली,तसेच World ,MentalHealth day या विषयावर ॲड. पल्लवी कांबळे यांनी माहिती दिली Nathonal Girl Child day याविषयी सह .न्यायाधीश पुनम बिडकर मॅडम यांनी माहिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्य न्यायाधीश म्हणाल्या की सर्वसामान्य जनतेने मोफत कायदेविषयक सल्ला शिबिरचा फायदा घेऊन आपले न्यायालयीन वाद विवाद या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करावे जेणेकरून आपला वेळ व पैसा वाचेल त्यासाठी मध्यस्थी केंद्रातील वकिलांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यास सहकार्य करावे असे म्हणून दिनांक 12 .11.2022 रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग घ्यावा असे आव्हान करून दीपावलीच्या वकील संघटनेच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन ॲड.नानासाहेब तनपुरे यांनी केले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल भैय्या शेटे, उपाध्यक्ष ॲड.कारभारी ढोकणे, सेक्रेटरी ॲड.ज्ञानेश्वर येवले ,सह सेक्रेटरी ॲड.चंद्रशेखर शेळके ॲड. आसिफ शेख, ॲड.अजय पगारे, ॲड.विशाल होले,ॲड.भगवान उरहे, ॲड. कचेश्वर घाडगे, ॲड. सुहास तोडमल , ॲड.ऋषी पंडित, ॲड. संतोष साळुंखे, ॲड.भास्कर तारडे, ॲड. अशोक तनपुरे, ॲड. विठ्ठल कोबरणे ,सरकारी वकील वाघ साहेब ,सरकारी वकील रवींद्र गागरे , ॲड. जयश्री घावटे, ॲड.ज्योती राऊत, ॲड.शोभा रणवरे, ॲड.कल्याणी पागिरे, ॲड.सुनिता लहाने, ॲड. प्रभावती धुमाळ , ॲड. मनीषा आढाव, ॲड. सविता गांधले ॲड. ऋषिकेश मोरे यांचे सह कोर्टातील संपूर्ण स्टाफ प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थितांचे ॲड.मच्छिंद्र देशमुख यांनी आभार मानले.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत