अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्विकारला पदभार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्विकारला पदभार

अहमदनगर(वेबटीम) नव्याने आलेले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मावळते जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्...

अहमदनगर(वेबटीम)


नव्याने आलेले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मावळते जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्याचा पदभार शनिवारी (दि.२२) सायंकाळी स्वीकारला.


यावेळी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, एलसीबी पोनि अनिल कटके आदिंसह नगर शहरातील पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 




२०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली. अहमदनगर जिल्हा त्यांना नवखा नसल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यातील विस्कटलेली घडी बसविण्यात ते नक्कीच यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी राकेश ओला कसे सामोरे जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत