चिमुकला गायक जयेश खरे याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिमुकला गायक जयेश खरे याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सन्मान

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारा जयेश विश्वास खरे ह्या चिमुकल्याने अगदि पल्लेदार आवाजात आपल्या श...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारा जयेश विश्वास खरे ह्या चिमुकल्याने अगदि पल्लेदार आवाजात आपल्या शालेय वर्गामंध्ये गायला आहे. हा व्हिडीओ शोशल मीडिया मंध्ये तुफान वायरल झाला आहे. वर्गात गायलेले चंद्रा गाणं शिक्षक कृष्णा राठोड यांनी आपलोड केल्यानंतर तो सर्वत्र व्हायरल झाला.या गाण्याने सर्वांना भुरळ घातले आहे. जयश खरे याच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल आहे.त्याचे वडिल ऑर्केस्ट्रात मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परिस्थिती मुळे आपल्याला मोठे गायक होता आले नाही मात्र आपल्या मुलाला मोठं गायक करण्याचं त्याच्या वडीलांच स्वप्न आहे.सर्वजण त्याच्या आवाजाच कौतुक करत आहे.या मुलाने आपल्या गायनाने संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. आणि याची दखल महाराष्ट्रातील फेमस म्युझिशियन जोडी अजय-अतुल त्यांना घेण्यास भाग पाडणारा जयेश खरे याचा देवळाली प्रवरा मध्ये मोठा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष भाऊ चोळके हे म्हणाले की जयश विश्वास खरे या मुलाला कसलेही अडचण आली तर वंचीत बहुजन आघाडी सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे. शहर उपाध्यक्ष नानासाहेब उंडे तसेच वंचित चे मार्गदर्शक अशोक भाऊ  मुसमाडे. वंचित चे उपतालुकाप्रमुख शिवाजी मुसमाडे.संदीप कदम.सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ घोरपडे,दिपक अडागळे,भैय्या शेख.मयूर अडागळे व सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.व कार्यक्रमाचे सूत्र संचालन साईनाथ भाऊ बर्डे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन विराट प्रतिष्ठान व आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत