मयत पोलीस भाऊसाहेब आघाव यांच्या कुटूंबियांना धमकी पत्र दिल्याच्या घटनेत माझा काडीमात्र संबंध नाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मयत पोलीस भाऊसाहेब आघाव यांच्या कुटूंबियांना धमकी पत्र दिल्याच्या घटनेत माझा काडीमात्र संबंध नाही

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथील आघाव कुटुंबियांना धमकी पत्र पाठवून नाहक बदनामी केले बाबत ह.भ.प. सुसेन महाराज नाईकव...

 राहुरी(वेबटीम)

राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथील आघाव कुटुंबियांना धमकी पत्र पाठवून नाहक बदनामी केले बाबत ह.भ.प. सुसेन महाराज नाईकवाडे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन दिले. पोलिस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्या प्रकरण किंवा त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याच्या घटनेत माझा काडीमात्र संबंध नाही. असे मत नाईकवाडे महाराज यांनी व्यक्त केले. 

        जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सुशेन अंगदराव नाईकवाडे हे हिवरगव्हाण ता. वडवणी, जि. बीड, हल्ली रा. लोणीकंद, पुणे. येथील रहिवाशी आहेत. ते कीर्तनकार तसेच शिवव्याख्याते आहेत. महाराष्ट्रभर कीर्तन व व्याख्यानाचे कार्यक्रम करत आहे. तसेच अनेक शहरामध्ये वकृत्व प्रशिक्षण वर्गही घेत आहे. नगरमध्ये एमआयडीसी जिमखाना येथे दर शनिवारी त्यांचे वकृत्व प्रशिक्षण वर्ग सध्या सुरु आहेत. 

       राहुरी तालुक्यातील मयत पोलिस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांच्या कुटुंबियांना निनावी पत्राद्वारे धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला. त्यात नाईकवाडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. राहुरी येथील आघाव कुटुंबियांचा व नाईकवाडे महाराज यांचा परिचय नाही, त्यांची कधी भेट झाली नाही. त्यांना नाईकवाडे यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार घडलाय. घटनेनंतर नाईकवाडे यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बाबतीत कोणीतरी सतत काहीतरी खोडसाळपणा करत आहे. त्यांची हकनाक बदनामी करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. 



         नाईकवाडे हे एक कीर्तनकार, लेखक वक्ता असून ते अध्यात्म आणि ज्ञानदानाचे कार्य महाराष्ट्रभर करतात. परंतु त्यांचा कोणीतरी प्रतिस्पर्धी त्यांना विनाकारण कुठल्यातरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी दोन वेळा असा प्रकार घडला आहे. या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु आघाव कुटूंबीयांना धमकी दिल्या प्रकरणात पून्हा नाईकवाडे यांचे नाव आले. या घटनेचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. हे षडयंत्र नेमकं कोण करतंय. त्याचा तपास लागला पाहिजे. म्हणून नाईकवाडे यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दिली आहे.







         तसेच आज नाईकवाडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवीला. सदरील विषयाची कसून चौकशी करून या पाठीमागे कोणाचे षडयंत्र आहे. हे तपासावे आणि माझा दोष असेल तर जरूर मला हवी ती शिक्षा द्यावी. परंतु माझी नाहक होणारी बदनामी थांबवून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. सुसेन महाराज नाईकवाडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत