अहमदनगर(वेबटीम) माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगा...
अहमदनगर(वेबटीम)
माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या (ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायत निवडणूकिसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
यामध्ये अकोले-११, जामखेड-३, कर्जत-८, कोपरगाव -२६, नगर-२७, नेवासा-१३, पारनेर-१६, पाथर्डी-११, संगमनेर-३७, राहाता-१२, शेवगाव-१२, श्रीरामपूर-६, राहुरी-११, श्रीगोंदा-१०ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर- उमेदवारी अर्ज दाखल कालावधी
०५ डिसेंबर- उमेदवारी अर्ज छाननी
७ डिसेंबर- उमेदवारी अर्ज माघारी अखेर दिवस व चिन्ह वाटप
१८ डिसेंबर- मतदान
२० डिसेंबर मतमोजणी
राहुरी तालुक्यातील आरडगाव, मांजरी, मानोरी ,कोंढवड, केंदळ खुर्द ,ताहाराबाद, खडांबे खुर्द ,ब्राह्मणगाव भांड ,कोल्हार खुर्द, सोनगाव ,तुळापूर, आदी ग्रामपंचायतीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत