कणगरची आदिशक्ती कणकावती माता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगरची आदिशक्ती कणकावती माता

डोंगराच्या हिरव्या कुशीत वसलेल्या राहुरी तालुक्यातील कणगर येथील  जागृत आदिमाया शक्ती  व नवसाला पावणाऱ्या कणकावती देवीचा यात्रोत्सव कार्तिक प...

डोंगराच्या हिरव्या कुशीत वसलेल्या राहुरी तालुक्यातील कणगर येथील  जागृत आदिमाया शक्ती  व नवसाला पावणाऱ्या कणकावती देवीचा यात्रोत्सव कार्तिक पौर्णिनिमित्त पार पडत असून हजारो भाविक भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात.

 राहुरी तालुक्यातील कणगर येथे डोंगरावर कणकावती देवीचे मंदिर असून या देवीला आउबाई असेही म्हणतात. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त  देवीची दोन दिवस यात्रा भरते. यात्रेला मोठी गर्दी असते अनेक भक्तगण आपला नवस फेडतात.


   कणगर हे गाव राहुरी फॅक्टरीपासून १० कि. मी अंतरावर आहे. या गावाविषयी पूर्वज अनेक आख्यायिका सांगतात. पूर्वी कणगर या गावाचे नाव कणगिरी असे होते. नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील उल्लेखावरून या ठिकाणी कणकावती देवी वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. पुरातन काळी देवीच्या कृपेने गावातील राजाला मुलगा झाला म्हणून त्या राजाने मुलाचे नाव कणक असे ठेवले. राजाची देवीवर मोठी श्रद्धा होती. त्या राज्यात जनता सुखी होती.कुठलीही आपत्ती ओढावली तर राजा देवीला साकडे घालत मग देवी प्रसन्न होऊन त्यावर मात करत असत.


 आउबाई तथा कणकावती देवी कणगर गावातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे. आदिमायेच्या कृपेने श्री.मच्छिंद्रनाथ  यांनी या भूमीत वास्तव्य केलेले असून त्याच काळात श्री.गहिनीनाथ यांचा गोरक्षनाथांच्या संजीवनी मंत्राने जन्म झाला आहे. गहिनीनाथांच्या सेवेसाठी लगतच सटूआई जागृत मंदिर असून या ठिकाणी भाविकांची विशेषतः लहान मुलांना घेऊन महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. संजीवन मंत्राने पावन झालेली ही जागा असल्याचे बोलले जाते. या गावाच्या परिसरात बुबळेश्वराचे मंदिर असून महाशिवरात्री तसेच श्रावण मासात दर्शनासाठी मोठी गर्दी असते.

 कणकावती देवी माता मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राहुरी तालुक्यासह परगावावरून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते. विजयादशमीच्या दिवशी आदिमाया कणकावती मातेची मिरवणूक काढून महाप्रसाद वाटप करण्यात येते.

 नवसाला पावणारी देवी म्हणून कणकावती मातेची महती असून कार्तिक पौर्णिमानिमित्त देवीची दोन भरणाऱ्या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. मनोभावे देवीचे दर्शन करून अनेक भक्त आपले नवस फेडतात. सकाळ पासून देवीच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागलेली असते. यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचा हंगामा आदींसह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लहानग्यांसाठी खेळण्याचे व खाऊचे मोठे दुकान सजलेली असतात. देवी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

  कणकावती देवी मातेच्या मंदिराचा कळस, रंगरंगोटी व जीर्णोद्धाराचे काम  कणकावती मातेच्या आशीर्वादाने काम पूर्ण झाले. त्यासाठी अनेकांनी मनापासून सढळ हाताने मदत केली आहे.

   आदिमाया कणकावती देवी मातेस माझा  कोटी कोटी प्रणाम...


   श्रीकांत जाधव

मो-९६६५९१९९३३

   -७३५०३७००७०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत