अखेर मंत्री अब्दुल सत्तार यांचा राहुरी कृषी विद्यापीठातील उद्याचा दौरा रद्द! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर मंत्री अब्दुल सत्तार यांचा राहुरी कृषी विद्यापीठातील उद्याचा दौरा रद्द!

राहुरी(वेबटीम)  कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सत्तार यांचा सर...

राहुरी(वेबटीम)


 कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सत्तार यांचा सर्वत्र निषेध होत असून माजीमंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार यांचा पुतळा दहन करून निषेध नोंदविला. आ.तनपुरे यांनी तर मंत्री अब्दुल सत्तार यांना राहुरीत पाय ठेऊ देणार देणार नाही असा इशारा दिला होता. उद्या ९ नोव्हेंबर रोजी मंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत राहुरी कृषी विद्यापीठात कार्यक्रम संपन्न होणार होता. मात्र  ना.सत्तार यांनी विद्यापीठ दौरा रद्द केला असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व महसूलमंत्री विखे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.



माजीमंत्री आ.तनपुरे यांच्या इशाऱ्यानंतर सकाळी कृषी विद्यापीठ राहुरी येथे  कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा रद्द करावा या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव लव्हाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे ,पंचायत समिती सदस्य सुरेश निमसे ,नगरसेवक नंदू तनपुरे ,दिलीप जठार, शामराव खेतमाळसकर, जालिंदर आढाव, राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष ओंकार कासार, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष महेश उदावंत आदी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीतअडचणीत सापडलेल्या मंत्री सत्तार यांनी राहुरी विद्यापीठ दौरा रद्द केला आहे. सोबतच राज्यपाल कोश्यारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हा कार्यक्रमास गैरहजेरी लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य-2022 या कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम  उद्या  सकाळी 10.00 वाजता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. संजय सावंत यांच्या शुभहस्ते व राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.




 या कार्यक्रमास विधानसभा सदस्य तथा कार्यकारी परिषद सदस्य आमदार मोनिकाताई राजळे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे (भा. प्र.से.), प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत