राहुरी(वेबटीम) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राहुरीत राष्ट्रवादी काँ...
राहुरी(वेबटीम)
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात माजीमंत्री आ.प्राजक्त तनपुरे सहभागी झाले होते.
येत्या ९ नोव्हेंबर रोजी राहुरी कृषी विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.
त्यांना राहुरी तालुक्यात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा माजीमंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत