राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत बाळासाहेब पंडित, संदीप पंडित यांनी सुरू केलेल्या हॉटेल आश्विन व उर्मी ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत बाळासाहेब पंडित, संदीप पंडित यांनी सुरू केलेल्या हॉटेल आश्विन व उर्मी अमृततुल्य गुळाचा चहा या नवीन वास्तूचे उद्घाटन नुकतेच राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तहसीलदार एफ. आर शेख, म्हाडा नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, आर पी आय अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, मराठा ग्रुपचे अध्यक्ष दासु पठारे ,भारत पेट्रोल पंपचे मालक सुधीर तनपुरे ,हॉटेल साई समाधानचे मालक दत्तात्रय दरंदले,विशाल,उर्मी चहाचे संचालक संतोष वाघमारे व श्री. लोखंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास आर पी आय संघटना व सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळ यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठा ग्रुपचे सर्व मान्यवर,एकलव्य संघटनेचे सर्व मान्यवर, समस्त पंडित परिवार उपस्थित होते.
प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार भिंगारे व सचिन रणधीर यांनी केले तर आभार हॉटेल अश्विनचे बाळासाहेब पंडित, संदीप पंडित यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत