राहुरी(वेबटीम) अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील यांनी दिलेले शुभेच्छा पत्र पाहून विठ्ठलवाडी शाळेतील विद्यार्थिनींना...
राहुरी(वेबटीम)
अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील यांनी दिलेले शुभेच्छा पत्र पाहून विठ्ठलवाडी शाळेतील विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांनाही आनंद झाला आहे.
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टी लागण्यापूर्वी तालुकास्तरीय (गटविकास अधिकारी, तहसीलदार साहेब ,पोलीस निरीक्षक) व जिल्हास्तरीय(जिल्हाधिकारी अहमदनगर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ,प्राथमिक शिक्षणाधिकारी अहमदनगर,पोलीस अधीक्षक अहमदनगर)या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सचित्र पत्राद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या.
विद्यार्थ्यांच्या या छोट्याशा पत्राची दखल घेत जिल्ह्याच्या प्रशासकीय कामात व्यस्त असताना देखील अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) भास्कर पाटील यांनी दिले विद्यार्थ्यांच्या पत्रांना उत्तरे व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ही शुभेच्छापत्रे केंदळ बुद्रुक गावच्या ग्रामसेविका आदरणीय भिसे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य विजय चव्हाण,अविनाश हरिश्चंद्रे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना सुपूर्त करण्यात आले. शिक्षणाधिका-यांचे पत्र पाहून विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांनी खूप आनंद झाला.
प्रसंगी दत्तात्रय हापसे,मारूती फुलारे, पप्पु कैतके,अक्षय गाडे ,श्रीमती.अर्चना नालकर मॅडम हे उपस्थित होते.
मुख्याध्यापक राजू उदमले यांच्या या उपक्रमाचे राहूरीचे गटशिक्षणाधिकारी अर्जून गारूडकर साहेब, केंद्रप्रमुख रवींद्र थोरात साहेब तसेच केंदळ व विठ्ठलवाडीतील पालकांनीही कौतुक केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत