राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील धामोरी येथे २ लाख रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन राहुरी पोलिसांनी नष्ट केले असून या ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील धामोरी येथे २ लाख रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन राहुरी पोलिसांनी नष्ट केले असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना धामोरी शिवारात अवैध हातभटटीची दारु बनत असल्याची गुप्त मिळाल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार ना-हेडा, पोलीस हवालदार साईनाथ टेमकर, पोलीस नाईक सुशांत दिवटे, राधिका कोहकडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोषकुमार राठोड, जयदीप बडे, अमोल पडोळ आदींचे पथक पाठविले असता, दोन ठिकाणी छापा टाकुन एकूण २ लाख रुपयांची गावठी तयार दारू व रसायन नष्ट केले आहे.
यावेळी रंभाबाई ताराचंद गि-हे( वय ३६ वर्ष रा.धामोरी फाटा) यांच्याकडून १,१५,०००/- रू किंमतीची तर राजेंद्र मच्छिंद्र गि-हे वय ४१ वर्ष रा. धामोरी फाटा ता. राहुरी ८५,०००/- रू किंमतीची गावठी हातभटटीची तयार दारु व कच्चे रसायन मिळून आले. दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साईनाथ टेमकर हे पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार ना.हेडा, पोलीस हवालदार साईनाथ टेमकर, पोलीस नाईक सुशांत दिवटे, राधिका कोहकडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोषकुमार राठोड, जयदीप बडे, अमोल पडोळ यांनी केली आहे.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत