राहुरीतील 'हा' नेता होणार भाजपात दाखल ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील 'हा' नेता होणार भाजपात दाखल !

  राहुरी/वेबटीम:- भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवे...

 राहुरी/वेबटीम:-

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत त्यांचे फारसे मन न रमल्याने ते पुन्हा स्वगृही परतरतील अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. आज पुन्हा या चर्चेने जोर धरला आहे. अमोल भनगडे यांच्यासह कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती मिळते. याबाबत भनगडे यांच्याशी संपर्क साधला असताना ते नॉटरीचेबल होते.





माजी आ.शिवाजी कर्डिले यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी  २ मार्च २०२२ रोजी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आ.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्डिले यांचे जवळचे समजले जाणारे अमोल भनगडे हे राष्ट्रवादीत गेल्याने सर्वांना धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीत भनगडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी कबूल केली असावी असे अनेकजण अंदाज बांधत होते.

मात्र अमोल भनगडे यांचे राष्ट्रवादीत मन रमत नव्हते. खा.सुजय विखे व माजी आ.शिवाजी कर्डिले यांच्या सतत संपर्कात होते. विखे व कर्डिले यांच्या उपस्थितीतील अनेक कार्यक्रमांना अमोल भनगडे हजेरी लावत असत. त्यामुळे भनगडे पुन्हा भाजपात दाखल अशी चर्चा सुरू होती.

आज भनगडे यांच्या घरवापसीच्या चर्चेने पुन्हा वेग घेतला असून ते आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले असल्याचे माहिती समजते. याबाबत भनगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉटरीचेबल होते. दुसरीकडे मात्र त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ' किंग इज बॅक', अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही वेळात भनगडे  भाजपात घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत