मुळा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास राहुरी पोलिसांकडून अटक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास राहुरी पोलिसांकडून अटक

  राहुरी/वेबटीम:- मुळा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीर वाळूची चोरी करून निघालेल्या आरडगाव येथील एकास राहुरी शहरातील तनपुरे वाड...

 राहुरी/वेबटीम:-

मुळा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीर वाळूची चोरी करून निघालेल्या आरडगाव येथील एकास राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरातून टेम्पो व २ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.


आरडगाव येथील नसीर इकबाल  सय्यद(वय-२०) हा  आज गुरुवारी पहाटे एम.एच.१७ क्यू-४७६५ या ३ लाख रुपये किंमतीच्या टाटा कंपनीच्या टेम्पोमधून ७ हजार रुपये किंमतीची दोन ब्रास शासकीय वाळू मुळा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना बेकायदा वाळूची चोरून वाहतूक करताना राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरात पकडण्यात आला.


याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अमोल पडोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नसीर इकबाल सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे, श्री.ताजने, अमोल पडोळे, नदीम शेख, अमित राठोड आदींनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत