राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- गेल्या ८ महिन्यांपूर्वी भाजपातुन राष्ट्रवादीत गेलेले राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील अमोल भनगडे यांनी आज दुपारी १२...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
गेल्या ८ महिन्यांपूर्वी भाजपातुन राष्ट्रवादीत गेलेले राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील अमोल भनगडे यांनी आज दुपारी १२.३० वाजता मुंबई येथील भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ.शिवाजीराव कर्डीले, आ.राम शिंदे, माजी आ.स्नेहलता कोल्हे व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
अमोल भनगडे यांनी भाजपात प्रवेश करणार असून ते मुंबईकडे रवाना झाल्याचे वृत्त 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलने सकाळी प्रसिद्ध केले होते.हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून दुपारी १२.३० वाजता अमोल भनगडे यांची भाजपात पुन्हा घरवापसी झाली आहे.
भनगडे यांच्या समवेत पोपट कोबरने, विकास कोबरणे, विलास कोबरणे, प्रमोद कोबरणे, पत्रकार विनीत धसाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत