राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील श्री अशोक माधवराव जोशी (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना) ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील श्री अशोक माधवराव जोशी (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना) यांचे चिरंजीव श्री महेश जोशी यांची 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात 31व्या क्रमांकाने राज्यकर निरीक्षक (State Tax Inspector) या पदावर निवड झाली आहे, त्यांचे पदवीचे शिक्षण श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेज (B.Sc.) व त्यानंतर पदवीत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ येथे पूर्ण केले. अतिशय मेहनतीने, जिद्दीने व कठोर परिश्रम घेऊन या पदाला गवसणी घातली आहे.
त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडणार आहे.
याबद्दल सर्व पंचक्रोशीतील तसेच राहुरी फॅक्टरी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने तसेच चिंचविहिरे ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटी सदस्य व श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
तसेच श्री महेश जोशी हे या यशानंतरही या पुढील परीक्षेसाठी प्रयत्नशील असणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत