राहुरी फॅक्टरीतील मातोश्री हॉस्पिटल येथे रविवारी मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील मातोश्री हॉस्पिटल येथे रविवारी मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

राहुरी फॅक्टरी:- राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्प्लेक्स येथे डॉ.रवी घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिन...

राहुरी फॅक्टरी:-


राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्प्लेक्स येथे डॉ.रवी घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने रविवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ६ वाजता मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी  व निदान केले जाणार असून नंबरचे चष्मे अवघ्या दीडशे ते दोनशे रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. या शिवाय मेडिकल हेल्थ चेकअप,ब्लड प्रेशर तपासणीही केली जाणार आहे.

तरी मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर नाव नोंदणी साठी  ७९७२६६२९३१ व ९७६६०३३२५७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत