राहुरी(वेबटीम) श्रीदत्तजयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र शिर्डी ते कर्हाड श्रीसाईबाबा पालखीचे शनिवारी, दि.२६ रोजी राहुरी शहर...
राहुरी(वेबटीम)
श्रीदत्तजयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र शिर्डी ते कर्हाड श्रीसाईबाबा पालखीचे शनिवारी, दि.२६ रोजी राहुरी शहरात आगमन होत आहे.
गेल्या २२ वर्षांपासून कर्हाड ते श्रीक्षेत्र शिर्डी साई पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पालखीचे राहुरी शहरात भव्य स्वागत होणार असून साईपालखीची राहुरी शहरातून सवाद्य मिरवणूक निघणार आहे. तद्नंतर राहुरी येथील युवानेते रवीभाऊ आहेर यांच्या निवासस्थानी पालखीचे स्वागत करण्यात येऊन मध्यान्ह आरती होईल. व तद्नंतर साईभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त साईभक्तांनी सहभागी होऊन साईपालखी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त उद्योजक रवीभाऊ आहेर, राजेश आहेर व साईभक्त मंडळ राहुरी यांचेवतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत