पानेगांव (वार्ताहर)- नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरात अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून धूरा सांभाळलेले सुनिल...
पानेगांव (वार्ताहर)-
नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरात अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून धूरा सांभाळलेले सुनिलभाऊ गडाख यांचा अद्वितीय कार्याने मुळाथडी परीसराचा कायापालट झाला असल्याचं गौरवोद्गार मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष तथा पानेगांव तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप यांनी काढले.
सुनिलभाऊ गडाख हे पानेगांव येथे विविध कामांचा पाहणी दौऱ्यावर गडाख आले होते.
यावेळी घोलप यांनी सांगितले की, गडाख यांनी खरवंडी गटात कोट्यावधी रुपयांचा निधी देवून गटाचा विकास केलाचं त्याच बरोबर तालुका, जिल्ह्यात हि आपल्या कामाची नवी ओळख निर्माण करुन युवकांचे संघटन उभा करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यामागे हि सुनिलभाऊंचे मोठे योगदान आहे त्यामुळे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्यातील हि विकासाला मोठी चालना मिळाली. मुळाथडी परीसरात खेडलेपरमानंद,शिरेगांव, लांडेवाडी, गणेशवाडी,पानेगांव,करजगांव, अंमळनेर,वाटापूर,तामसवाडी आदी गावांत जे काम केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले.त्याच बरोबर आरोग्य कृषी पशुसंवर्धन गोरगरिबांचा योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विविध आमुलाग्र परिवर्तन घडवून आणले. निश्चितच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सुनिलभाऊ गडाख यांचावर जबाबदारी टाकली पाहिजे यावेळी घोलप यांनी म्हटले
सुनिल गडाख यांनी सत्कार उत्तर देताना म्हटले की, जेष्ठ नेते यशवंतराव गडाख तसेच माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी तसेच संतमहंतांचे,ज्येष्ठांचे आशिर्वाद युवकांचे सहकार्याने शक्य झालं. दत्तात्रय घोलप यांची समाजसेवी कार्याची ओळख असून निश्चितच त्यांचा सारखं व्यक्तिमत्त्व आपल्या बरोबर असल्याचं सार्थ अभिमान आहे.
यावेळी मुळा कारखान्याचे संचालक तथा पानेगांव लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, रंगनाथ जंगले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले,वाटापूरचे सरपंच भिकाभाऊ जगताप, उद्योजक जनार्दन गागरे, किशोर जाधव, जनसंपर्क अधिकारी शिरीष बोरुडे, योगेश घोलप,नारायण तांबे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत