आंबी(वेबटीम) श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्स परिवार आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष व इतिहास...
आंबी(वेबटीम)
श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्स परिवार आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष व इतिहास प्रेमी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर शहरातील शिवबा सभागृहात संपन्न झाला.
यावेळी श्रीरामपूरचे प्रसिद्ध चित्रकार रवि भागवत, एज्युकेशन सोसायटीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान सानप, मराठा बहुद्देशीय संस्थेचे विलास जाधव, डॉ. रविंद्र महाडिक, नितीन गवारे, केविल खेमणर, माधव आसने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले. याप्रसंगी बाल शिवव्याख्याते प्रथमेश वर्धावे याने शिवरायांचा सळसळत्या रक्ताचा इतिहास सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सह्याद्री ट्रेकर्सच्या उपक्रमांचे कौतुक करत आपल्या छोटेखानी भाषणात शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला.
मान्यवरांच्या हस्ते निमगाव खैरी येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपला प्रथम, मोरगे वस्ती येथील तेजस शिरसाठ द्वितीय तर शिरसगाव येथील रणवीर गवारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर शुभम शिंदे, शौर्या ससाणे, मावळा ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला चंदन, प्रास्तविक सचिन चंदन तर आभार रश्मी उनावने यांनी मानले. सह्याद्री ट्रेकर्सच्या भविष्यातील वाटचालीची माहिती पुस्तिका सचिन भांड यांनी मांडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश शिंदे, किरण पाळंदे, श्रीकांत दहीमीवाळ, कृष्णा शेजवळ, श्रीकांत जामदार, अभिषेक चतुरे, ऋषी गवादे, डॉ. शलाका आदिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत