श्रीरामपूर (वेबटीम) श्रीरामपूर शहरातील रासकर नगर दलित वस्तीत खाजगी प्लॉट धारकाचे बेकायदेशीर अतिक्रमण रोखा व दलित समाजावर होणारा अन्याय रोखा...
श्रीरामपूर (वेबटीम)
श्रीरामपूर शहरातील रासकर नगर दलित वस्तीत खाजगी प्लॉट धारकाचे बेकायदेशीर अतिक्रमण रोखा व दलित समाजावर होणारा अन्याय रोखा थांबवा अशा आशयाचे निवेदन भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांना देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार हेमलता वाकडे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हंटले आहे की, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७ मूळा प्रवरा ऑफिस समोरील रासकर नगर हि दलित वस्ती (गट नंबर ५१ सिटी सर्वे नंबर २०४२) येथील सरकारी जागेत अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असून नगर पालिका सदरी त्यांच्या सर्व घराची भोगवटादार म्हणून नोंदी आहेत व सर्व रहिवासी दरवर्षी नगर पालिकेचा कर नियमाप्रमाणे भरत आहेत. परंतु या वस्ती शेजारी असणाऱ्या प्लॉट धारकाने या दलित वस्तीच्या प्लॉटवर अतिक्रमण वा कब्जा करण्याच्या हेतूने स्वतः च्या प्लॉट भोवती भिंत बांधन्यासाठी जे. सी. बी. आणून या दलित वस्ती च्या रहिवाशांची घरासमोरच्या न्हानी, बाथरूम, शौचालय, खुराडे, शेड पाडून या दलित वस्तीच्या जागेत कब्जा करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण केले आहे. या प्रकारामूळे येथील रहिवाशी भयभीत झालेले आहेत. तरी सदर या खाजगी प्लॉट धारकाची चौकशी करून हे अतिक्रमण रोखावे अन्यथा भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे जिल्हा महासचिव मुश्ताक भाई तांबोळी, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके, जिल्हा संयोजक आर. एम. धनवडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ त्रिभुवन, तालुका संयोजक एस, के. बागुल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मल्लू शिंदे, लहुजी सेनेचे रेस शेख आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत