राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे असलेल्या फॅमिली किराणा बझार यांच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्तान पाच हजार...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे असलेल्या फॅमिली किराणा बझार यांच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्तान पाच हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.याची सोडत गुरुवारी काढण्यात आली भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
श्रीरामपूर रोड येथे अल्पावधीत ग्राहकांच्या प्रसिद्धीस उतरलेले फॅमिली किराणा बझार नेहमीच ग्राहकांच्या फायद्यासाठी विविध ऑफर देण्यास तत्पर असते.
यंदाही दिवाळी निमित्ताने पाच हजार रुपयांच्या वर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता.या लकी ड्रॉ ची सोडत गुरुवारी काढण्यात आली. त्यामध्ये प्रथम विजेते सर्जेराव झगडे यांना पैठणी भेट देण्यात आली. द्वितीय विजेते किशोर चोथे यांना मिक्सर ग्राइंडर तर तृतीय विजेते सौरभ वरखडे यांना किचन सेट भेट देण्यात आली.तसेच शंभर पॉईंट पूर्ण झालेल्या ग्राहकांनाही बक्षिसे देण्यात आले
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख सुनील कराळे, किशोर थोरात, शरद मुसमाडे, रावसाहेब शिंदे, प्रशांत कोठुळे, श्री.आढाव काका,बबनराव डोंगरे, मच्छीन्द्र चंद्रे,महेश चंद्रे,गजानन कोहकडे, राजू अंत्रे, दत्ता साळुंके, ज्ञानेश्वर मोरे, प्रमोद साळुंके, ज्ञानेश्वर वाघ, प्रकाश कराळे, संदीप वाघचौरे, दत्तू भोंगळ, अझीम पेंटर,लक्ष्मण हारदे,प्रकाश हारदे आदी उपस्थित होते.
सर्वांचे आभार फॅमिली किराणा बझारचे संदीप पाटील व संदेश सोनवणे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत