डॉक्टरलाच ग्रासलं अनेक आजारांनी पण .... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉक्टरलाच ग्रासलं अनेक आजारांनी पण ....

 काहींच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त असते पण जे दुःखाच रूपांतर सुखात करतात तेच खरे जीवनपटावरील  नटसम्राट असतात. कृषी मेळाव्यात मला असंच...

 काहींच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त असते पण जे दुःखाच रूपांतर सुखात करतात तेच खरे जीवनपटावरील  नटसम्राट असतात.



कृषी मेळाव्यात मला असंच एक व्यक्तिमत्व भेटलं ते म्हणजे डॉक्टर सुनील  नारायण हिवराळे. 

त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की, सगळ्यात आनंदी मनुष्य असावा हा माणूस.

 जसा आपण विचार करतो तसं काही नसतं. एखाद्या तलावाची खोली मोजायची असेल तर आपल्याला तळाशी जावं लागतं.

 तसंच  त्यांचं आयुष्य जाणून घेण्याची मला ओढ लागली.  त्यांच्या शब्दातून मला त्यांची संघर्षमय कथा असणार हे नक्की कळलं. ते सांगू लागले,

 माझा जन्म हा मध्यमवर्गीय कुंटुबात झाला. माझे वडील शिक्षक होते. घरामध्ये पाच जण असल्यामुळे परिस्थिती जरा बेताचीच होती. लहानपणी तिसरीत असताना माझा उजवा हात मोडला.

 लहानपणापासून शारीरिक व्याधीना  मला सामोरे जावे लागले. वकील बनवून अन्यायाच्या विरोधात लढावे ही माझी इच्छा होती पण नियतीला दुसरेच मंजूर होते .

 जेव्हा मी BAMS ला ऍडमिशन घेतलं तेव्हा लोकांनी माझ्यावरती टीका केली. माझ्या आत्म्यावरती घाव केले. हा काय लोकांना इंजेक्शन देणार?


 गावात एकाला जरी  इंजेक्शन दिले तर हात तोडून टाकेल, अशा नाना प्रकारच्या टीका  माझ्यावरती केल्या गेल्या. तरीही मी खचलो नाही.

 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर म्हणजे खाणे ,पिणे ,शिक्षण, बालपण  यांच्यासारख्या असंख्य अडचणींना मला  सामना करावा लागला. तग धरणारा माझा जीव हा एखांद्या माळरानात तग धरणाऱ्या बाभळीपेक्षा कमी नव्हता.


 डॉक्टर यशवंत टेकले यांनी मला माझ्या वाईट प्रसंगी मदत केली. तीन वर्ष मी माझ्या बहिणीकडे पुण्यात राहिलो. तीन वर्षात एकदाही मी गावी गेलो नाही. त्यानंतर मी गावात येऊन हॉस्पिटल चालू केले.


 गावात हॉस्पिटल असल्याने पैसे कमी मिळत.  मला लहानपणापासूनच राजकारणाचा छंद होता. आपल्या गावाने प्रगती करावी ही इच्छा  कायमच मनात  होती. 


 मला  तिकीट दिले नाही.  माझे जिवलग मित्र तुकाराम इंगळे यांनी मला प्रोत्साहन दिले, आत्मविश्वास दिला.


  जेव्हा आपला एक खरा मित्र आपल्यासोबत असेल तेव्हा हजारो लोक आपल्या बद्दल काय विचार करतात याच काही घेणदेण आपल्याला नसत.


ग्रामपंचायत सदस्य निवडणूक झाली आणि मी अपक्ष म्हणून निवडून आलो.

 काही दिवसानंतर नियतीचे चक्र  पालटले आणि मला आजाराने घेरलं.

 मुळव्याधीचे ऑपरेशन करण्यात आले. तीन महिने मी ठीक राहिलो, नंतर मला आंतरधून  आजार झाला.


 तो बरा नाही होत तर लहान आतड्याचा अल्सर झाला आणि नंतर मी एक कार्यक्रम करत असताना माझा डावा हात मोडला.


 आमच्या गावात सोनाजी महाराज यांचा भव्य दिव्य रथ निघतो.यात्रा असल्याने गर्दी खूप असते आणि त्या चेंगाराचेगरीत माझा पाय मोडला. त्यानंतर अकोल्यामध्ये जाऊन मी  रॉड टाकला.

हे सगळं होत असताना मी एक एकदम निर्धस्तपणे उभा होतो.


 त्यानंतर मी एक अशीच हॉस्पिटलमध्ये जाऊन चाचणी केली.त्यात माझी एक किडनी फेल आहे हे समजलं.


जीर्ण झालेल्या   वटवृक्षावरती चकमकणारी सौदामिनी येऊन पडावी आणि वटवृक्ष क्षणात जमिनीस मिळावा अशी माझी स्थिती झाली होती.

 मी गेल्यावर माझ्या आई-वडील, मुलगा, बायकोचे कसे होईल या विचाराने मी खचलो.

 तेव्हा माझ्यावरती सकारात्मकपेक्षा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम जास्त झाला होता. आजारी असल्यामुळे माझे क्लिनिक बंद झाले आणि आणखीन समस्याने तोंड वरती काढले. आयुष्यात दुःख हे सागराप्रमाणे भासू लागले. सागराला जसा अंत नाही तसा माझ्या दुःखालाही अंत नव्हता.


माझे हीप बॉल ऑटोमॅटिकली काम करण्याचे बंद झाले आणि मी पूर्णपणे सुजून गेलो. 


जवळपास दहा लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितला आणि  complicated केस आहे असे म्हणून मला घरी आणले.


 कपडा फाटन तिथं ठिगळं लावायचं अशी माझ्या शरीराची स्थिती झाली होती.

 14 जानेवारी 2014 हा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे मला वाटू लागले कारण सगळ्यांनी मेला म्हणून सोडून दिले  होते.


 माझ्या डोळ्यात काळोखा अंधार होता पण दुरवर दिसणाऱ्या दिव्यांची लुकलुकती आस होती.


 बारा वर्षाचा माझा मुलगा माझ्याकडे कावराबावरा होऊन बघत होता. त्याच्या आसवांची किंमत लावता येत नव्हती. आपल्या आयुष्यात बाप राहतो की नाही ही चिंता  त्याच्या डोळ्यात दिसत होती ,पापण्या ओल्याचिंब झाल्या होत्या. 



 आईच्या दुःखाला तर सीमा नव्हती. असेल तरी  कशी? शेवटी पोटचा गोळा होतो ना.


  माझ्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या माझ्या बायकोने मला कधी खचून दिले नाही.


  ज्याला अडचणीने जंग जंग पछाडले आहे, आयुष्यातील प्रत्येक क्षण जो  जगण्यासाठी धडपडत आहे त्याला नियतीने अगदी सहज उचलून न्यावे ही गोष्ट माझ्या पत्नीला सहजासहजी पटत नव्हती.


 माझा नवरा डॉक्टर आहे तो घरी मरण्यापेक्षा तो हॉस्पिटलमध्ये मेलेला मला चालेल.

 माझ्या बायकोने मला हॉस्पिटलमध्ये नेले. लोकमत पेपरला जाहिरात आली होती. ती डॉक्टर उल्हास पाटील खानदेश यांची. 


 42 दिवस मी आणि माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये होतो. पत्नीने डॉक्टर उल्हास पाटलांना विनवणी केली  आणि माझे Total hip replacement operation गोदावरी हॉस्पिटल जळगाव खानदेश येथे झाले.


नवऱ्याला  मृत्यूच्या मुखातून आणलेल्या सावित्रीची फक्त मी कथा  ऐकली होती पण   माझ्या घरातली सावित्री मी प्रत्यक्षात अनुभवली. अंजनगावचे संदेश तिठे, प्रकाश भोतकर, शिवा ढोरे, तुकाराम इंगळे , राजू इंगळे मलकापूर    आणि गावातील सदस्यांनी मला मदत केली. 


  तीन महिन्यानंतर मला दिसणं कमी झालं व दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू निघाले. डॉक्टर शरद पाटील, औरंगाबाद यांच्या सहकार्याने दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन मोफत झाले. 


 त्यानंतर मला ग्रस्टिकल प्रॉब्लेम झाला.


 एवढे सगळे ऐकल्यानंतर मी तर एकदम थक्कच राहून गेले आणि शेवटी त्यांना एकच प्रश्न विचारला एवढी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आली कस काय?


  त्यावेळेस ते म्हणाले इगतपुरीला जाऊन मी सात दिवसाचे शिबिर केलं. त्यात साधना कशी करायची हे सगळं मला शिकवलं गेलं. आज मी जिवंत आहे तर फक्त माझ आत्मिक बळ, सकारात्मक ऊर्जा आणि माझे स्नेही..!!!!


 मी आता ट्रेक करतो, शेती करतो, हॉस्पिटल चालवतो. अजूनही माझ्या आयुष्यात दुःख कमी नाही...


 त्यांच्याबद्दल ऐकून नकळत डोळे  पान्हावले.

 जगाव तर डॉक्टर सुनीलसारखे नियतीने कितीही आपल्यावर  घाव घातले तरी ते घाव आपल्यांना सोसता  आले पाहिजे. सलाम अशा व्यक्तिमत्वाला!!!


मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻

अहमदनगर, राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत