सिव्हीलमध्ये 3285 रुग्णांनी सोडले प्राण! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सिव्हीलमध्ये 3285 रुग्णांनी सोडले प्राण!

नगर : वेबटीम    गेल्या अडीच वर्षात जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना हजारो रुग्णांना जीवदान मिळाले, तर तब्बल 3285 रुग्णांनी आपले प्...



नगर : वेबटीम   

गेल्या अडीच वर्षात जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना हजारो रुग्णांना जीवदान मिळाले, तर तब्बल 3285 रुग्णांनी आपले प्राण सोडले आहेत, यात कोरोना कालावधीपासून आतापर्यंतच्या साधारणतः दोन वर्षात दगावलेल्या रुग्णांचा आकडा हा 2677 इतका आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाही कमी  झाला आहे, त्यामुळे ’मृत्यूचे हे तांडव देखील कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.

 


जिल्ह्यात 98 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्यांचे 555 उपकेंद्र आहेत, 14 ग्रामीण रुग्णालय, 2 जिल्हा उपरुग्णालय आहे. तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयातही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधायुक्त आणि निशुल्क उपचार दिली जातात, त्यामुळे जिल्हा रुग्णालय हे सर्वच घटकातील रुग्णांना मोठा आधार देणारे ठरत आहे. दरम्यान, या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, समवेत डॉ, जमदाडे, डॉ.घुगे आदींच्या ’प्रयत्नातून रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी तसे नियोजन करण्यात आलेले आहे, अशाप्रकारे  रुग्णसेवेसाठी प्रशासन अलर्ट असल्याने अनेकांना येथे जीवदान मिळाले आहे. तर वेगवेगळ्या कारणांनी येथे मृत्यूचे प्रमाण देखील काहीसे चिंताजनक दिसते.  

 सिव्हिलमध्ये मृत्यूचे तांडव

 2019-20 या वर्षात जिल्हा रुग्णालयात 630 रुग्णांचा उपचारादरम्यान ’मृत्यू झाला, तर 2020-21 या कोरोनाच्या काळात सिव्हिल मध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव पहायला मिळाले, या वर्षात तब्बल 1847 रुग्णांनी येथे जीव सोडला. ’मृत्यूची ही लाट 2022 मध्येही काही प्रमाणात दिसली, त्यामुळे ’मार्च 2021 ते एप्रिल 2022 पर्यंत 803 रुग्ण सिव्हिलमध्ये दगावले.

 जन्मदर घटला, आता घडी पूर्वपदावर!

 जिल्हा रुग्णालयात गरोदर ’मातांचे उपचार चांगल्या प्रकारे केले जातात, त्यामुळे या ठिकाणी प्रसुती देखील अधिक आहे, 2019-20 या वर्षात 6479 नवजात शिशुंनी येथे जन्म घेतला आहे, तर 2020-21 या वर्षात कोरोना कालावधीत जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणी दक्षता म्हणून प्रसुती सुविधा बंद होती, परिणामी या वर्षात 608 बालकांचा जन्म झाला, तसेच 2021- एप्रिल 2022 पर्यंत 1002 नवजात जन्म झाले आहेत.  दरम्यान, कोरोनात सिव्हीलने डिलिव्हरी रुग्णांना डॉ विखे पाटील हॉस्पिटल, डॉ देशपांडे हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी पाठऊन त्यांची अडचण होऊ दिली नाही. सध्या कोरोना रुग्ण कमी झाल्याने पुन्हा प्रसुती सुविधा येथे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिव्हीलची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ घोगरे आणि त्यांचे सर्व सहकारी रुग्णसेवेत अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोरगरीब घटकातील रुग्णांची उपचारासाठी सिव्हीलकडे वर्दळ वाढू लागली आहे.                                     कोरोना कालावधीत आमच्या सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी चांगली रुग्णसेवा दिली. त्यावेळी दक्षता म्हणून येथील प्रसुती सुविधा बंद ठेवली होती. मात्र, जानेवारीपासून सिव्हीलमध्ये प्रसुती सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.

डॉ. संजय घोगरे

जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत