कणगर येथील कणकावती माता यात्रा उत्सवास प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथील कणकावती माता यात्रा उत्सवास प्रारंभ

राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील कणगर येथील ग्रामदैवत कणकावती माता यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे.  आज सकाळी राहुरीच्या नायब तहस...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील कणगर येथील ग्रामदैवत कणकावती माता यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे.



 आज सकाळी राहुरीच्या नायब तहसीलदार  सौ. संध्या दळवी व कुमार दळवी यांच्या हस्ते  सपत्नीक विधिवत पूजन संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपस्थित होते.विधिवत पूजेचे पौरोहित्य प्रकाश नवले गुरू यांनी केले.


यावेळी यात्रा कमिटीच्यावतीने पूजेचे मानकरी नायब तहसीलदार सौ. संध्या दळवी, कुमार दळवी तसेच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा सन्मान करण्यात आला.

 


आज मंगळवार ८ ते बुधवार ९ ऑक्टोबर दरम्यान कणगरची यात्रा भरणार असून कुस्त्यांचा हंगामा, लोकनाट्य तमाशा तसेच इतर कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रेनिमित्त पाळणे, खेळणीची व खाऊची दुकाने थाटली असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत