संभाजी भिडेच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ‘रिपाई’ महिला आघाडी आक्रमक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संभाजी भिडेच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ‘रिपाई’ महिला आघाडी आक्रमक

आंबी(वेबटीम)  शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडी आक्रमक झाली असून भिडे या...

आंबी(वेबटीम)


 शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडी आक्रमक झाली असून भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात तहसीलदार व पोलिस निरीक्षक राहुरी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्षा सिमा बोरुडे, उपाध्यक्षा छाया दुशिंग, प्रियंका सगळगिळे, वंदना सगळगिळे, रेखा सगळगिळे, उषा सगळगिळे, निलम सगळगिळे, लक्ष्मी जगधने, वंदना सांगळे, चंद्रकला सगळगिळे, रेखा आदींच्या सह्या आहेत.


   निवेदनात म्हंटले आहे की, शिवप्रतिष्ठाने अध्यक्ष संभाजी भिडेने मंत्रालय मुंबई येथे एका महिला पत्रकाराने माहिती विचारण्याठी प्रश्न केला असता तु तुझ्या कपाळाला कुंकू लाव त्यावेळेस तुझ्याशी मी बोलतो, भारत माता विधवा नाही अशा शब्दामध्ये गरळ ओकून सार्वजनिक ठीकाणी एका महिला पत्रकाराच्या राहणीमानावरून तीला लज्जा उत्पन्न करून अवमान केला आहे. भारतिय संविधानाने भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेशभूशा, केशभूषा, राहणीमान कसे असावे याचे स्वातंत्र्य दिले आहे. तीने कसे राहावे, टीकली (कुंकु) लावावे किंवा लावू नये हा तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो त्या स्रीला भारतिय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्याचे देखिल उल्लघन संभाजी भिडे यांनी केले आहे.




    भारतातिल अनेक स्त्रीयांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक क्षेत्रात राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तीनही दलामध्ये उतुंग शिखरे गाठली आहेत. यामुळे महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले म्हणून कार्यदेशिर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे व पदाधिकाऱ्यांनी  निवेदनात केली आहे. 


“भारतामध्ये कधीकाळी मातृसत्ताक समाजव्यवस्था होती. शिवरायांनी परस्रीला मातेसमान मानले आहे. स्रीयांनी सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढाई लढली आहे. असे असताना संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) निषेध करत असून कोणत्याही स्रीवर अन्याय होत असल्यास जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”

 

स्नेहल सांगळे (तालुकाध्यक्ष, रिपाई महिला आघाडी)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत