अटीतटीच्या लढतीत पारधी संघ पोलीस आणि पत्रकारांवरही पडला भारी.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अटीतटीच्या लढतीत पारधी संघ पोलीस आणि पत्रकारांवरही पडला भारी..

  नगर विशेष प्रतिनिधी(वेबटीम)   उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून व कर्जत पोलिस आणि पत्रकारांच्या आयोजनातून घेण्या...

 नगर विशेष प्रतिनिधी(वेबटीम)

  उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून व कर्जत पोलिस आणि पत्रकारांच्या आयोजनातून घेण्यात आलेल्या 'सद्भावना चषक' क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात 'रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी' संघाने चार गडी राखून विजय मिळवला.



  कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर आयोजित स्पर्धेत विविध संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.या संघात रोटरी क्लब, शिक्षक संघ, कर्जत पोलीस, सर्व सामाजिक संघटना, डॉक्टर्स असोसिएशन,पारधी संघ,पत्रकार संघ आदींचा समावेश होता.स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक व लेझीमच्या प्रत्यक्षिकांनी स्वागत केले. त्यामुळे मोठा उत्साह निर्माण झाला होता. पाच शटकांच्या पहिल्या डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी संघाच्या स्पर्धेत रोटरी संघाने विजय मिळवला.दुसऱ्या स्पर्धेत पोलीस व पारधी संघ उतरले त्यात पारधी संघाने कर्जत पोलीस संघाला हरवले. शिक्षक व सर्व सामाजिक संघटना या तिसऱ्या संघात झालेल्या स्पर्धेत सर्व सामाजिक संघटनेने विजय मिळवला.प्रशासकीय अधिकारी संघ उपस्थित न राहिल्याने पत्रकार संघाला पुढील चाल देण्यात आली. 


उपांत्य फेरीत पारधी व पत्रकार असा सामना रंगला यातही पारधी संघाने पत्रकार संघाला नमवले. त्यानंतर रोटरी क्लब व सामाजिक संघटनेच्या झालेल्या स्पर्धेत रोटरीने आपला विजयाचा झेंडा फडकावला. अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत रोटरी क्लब व पारधी संघाच्या झालेल्या स्पर्धेत रोटरी क्लबने रोमांचकारी खेळ करून सद्भावना चषक करंडकावर आपले नाव कोरून पारधी संघाला पराभूत केले. विजेता संघ म्हणून रोटरी क्लबला घोषित करून पारधी संघाला उपविजेता संघ घोषित करण्यात आले.पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी अजित थोरबोले व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक देण्यात आले.सामने सुरू असताना अनेक खेळाडूंनी आपल्या रोमांचकारी खेळाने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची 'सद्भावना' ही संकल्पना खरोखरच उपस्थितांमध्ये सामाजिक सलोखा, विश्वास, प्रेम,माणुसकी रुजवणारी ठरली. यादव यांनी स्पर्धेसाठी केलेल्या आवाहनाला अनेकांनी भरभरून मदत केली या सर्वांचे त्यांनी आभार मानले. कर्जत पोलीस आणि पत्रकार यांनी भरविलेल्या अनोख्या स्पर्धेमुळे सर्वांनीच कर्जत पोलीस आणि पत्रकार यांचे खूप कौतुक केले..


*स्पर्धेतील मानांकने:*

सद्भावना चषक- रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी

मॅन ऑफ द सिरीज- प्रा.विशाल मेहेत्रे

बेस्ट बॅट्समन- निखिल काळे

बेस्ट कॅच- संदीप गदादे

बेस्ट बॉलर-अमोल जाधव (गट विकासाधीकारी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत