राहुरी फॅक्टरीतील ' या' मैदानाची भग्न झालेल्या मंदिरागत अवस्था - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील ' या' मैदानाची भग्न झालेल्या मंदिरागत अवस्था

राहुरी फॅक्टरी:- राहुरी फॅक्टरी तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाऊस ओसाड मैदान बघून मनोमनी दुःख वाटत. अनेकाना घडविणारे या प्रांगणाची अवस...

राहुरी फॅक्टरी:-

राहुरी फॅक्टरी तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाऊस ओसाड मैदान बघून मनोमनी दुःख वाटत. अनेकाना घडविणारे या प्रांगणाची अवस्था आज भग्नलेल्या मंदिरागत झाली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा लेख आवाज जनतेच्या माध्यमातून वाचकांसाठी देत आहोत.


प्रबहुतांशी लोकांना कदाचित हे ठिकाण आठवत असावं अशी माफक अपेक्षा आहे,पण आज या ठिकाणाची ही अवस्था बघून मन पिळवटून गेलंय.भग्न झालेल्या मंदिरासारखी अवस्था झालीये ह्या क्लब हाउस च्या मैदानाची!


शालेय जीवनातील सर्वात उस्फुर्त आणि आठवणीत राहणाऱ्या उत्सवांपैकी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस.15-15 दिवस अगोदरपासून सांस्कृतिक कार्यक्रम,NCC च्या परेड ची तयारी,शाळेचे नवीन गणवेश,त्यातला उत्साह,सहभाग,साक्षीदार,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पंचक्रोशीतील सर्व शाळा एकत्र येऊन झालेला गोंगाट,असल्या असंख्य गोष्टींचं साक्षीदार हे क्लब हाउस चं मैदान....कधीकाळी ढाण्या वाघासारखा डरकाळी फोडत होता पण आज मात्र याच्याकडे बघून कुपोषित आणि हवालदिल झालेल्या कुत्र्यासारखी जाणवत आहे.राहुरी फॅक्टरी परिसरातील शाळेत असणाऱ्या किंवा रहिवासी असणाऱ्या प्रत्येकाला अनामिक चटका लावून जाणारं आहे हे चित्र!!



स्वर्गीय सुख अनुभवल्या नंतर मात्र लंकेची पार्वती झालेल्या या मैदानाची ही अवस्था करणाऱ्या व्यवस्थे विषयी आणि जबाबदार असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल चीड येत आहे,परंतु यामागची हळहळ ही सकाळपासून जाता जात नाहीये,त्याला कदाचित कोरोनाचं सबंध जगावर असलेलं संकट जबाबदार असेल,त्याला कदाचित तालुक्याला संजीवनी देणाऱ्या साखर कारखान्याची झालेली दयनीय परिस्थिती जबाबदार असेल,संख्या वाढलेल्या परंतु बंद असलेल्या शाळा,त्यातील फोन च्या पूर्णपणे विळख्यात गेलेली विद्यार्थी जमात या सारख्या असंख्य गोष्टी जबाबदार असतील.ही होणारी मनाची घालमेल कदाचित नव्याने उभारू बघत असलेल्या आणि ऑनलाइन लेक्चर करून फुकट पास झालेल्या विद्यार्थ्यांना नाही समजणार कारण 15 ऑगस्ट,26 जानेवारी ला पहाटे उठणं,कपड्यांना पितळेच्या तांब्यात विस्तव टाकून दिलेली इस्त्री,ncc च्या बुटांना आणि बेल्ट ला केलेली पॉलिश,भल्या पहाटे कारखान्याच्या कामगार सोसायटीच्या भोंग्यातून येणाऱ्या देशभक्तीपर गाणी,शाळेत जाऊन मग 3-3 च्या रांगेने हातात हात घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून या मैदानावर पोहचणे,नंतर लाल किल्यासमोर होणाऱ्या संचलनाला तोडीस तोड कारखाण्याचा सुरक्षा कामगार,शाळेतील NCC, पब्लिक स्कुल मधल्या सफेद गणवेशात असणाऱ्या विद्यार्थ्यांचं संचलन,माननीय चव्हाण साहेबांनी केलेलं पहाडी आवाजतील गर्जना,त्यांच्या हातात असलेली ती तलवार,त्यात सामील असलेली वाद्य,यांचा ताल-सूर हे अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी,याची चाड आजच्या ऑनलाइन विद्यार्थांना बहुतेक नाही समजणार..!!

नंतर बालवाडीच्या चिमुकल्यांनी दिलेल्या सलामीच्या कार्यक्रमाने सर्वांना विस्मयात न टाकावं तर नवलच,एक एक करून स्व.सगळगीळे मॅडम,राव मॅडम यांनी तयारी करून बसवलेले सांस्कृतिक कार्यक्रम,श्री खेडेकर सरांनी बसवलेल्या "हलगी-लेझीम" डान्स आणि इतर सर्व कार्यक्रम डोळ्यांची पापणी न पडू देता बघणं आणि सोबत धिंगाणा ही घालणं,सर्व कार्यक्रम संपल्या नंतर खाऊसाठी गर्दी (यावरून असंख्य टिप्पणी होऊ शकतात परंतु एकंदरीत लिखाण इमोशनल असल्याने तिकडं न गेलेलं बरं) करणं,उरलेला सबंध दिवस सुटीत घालवणं हे फक्त आणि फक्त आता आठवणीत होऊ शकतं...!!

ह्या सर्व च्या सर्व आठवणींना साक्षीदार असलेलं हे क्लब हाउस चं ओसाड मैदान बघून खरंच खूप वाईट वाटतंय..!! 


मैदान गाजलं-वाजलं-बहरलं,

कधिकाळी त्यानं अंग अंग शहारलं,

आज विझला विस्तव तो जरी,

ह्याच मैदानानं कैकांना घडवलं..!! 


मैदानावर नाचलेले तरुण झाले,

मैदान मात्र आता म्हातारे झाले,

गाजवत असेल  प्रत्येकजण आपलं-आपलं मैदान आज,

कळत नकळत ते इथूनच सुरू झाले...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत