सात्रळ(वेबटीम) संविधानाच्या गौरवदिनानिमित्त अहमदनगर येथीलस्नेहालय संचलित युवानिर्माण प्रकल्प आणि राज्यशास्त्र विभाग, पेमराज सारडा महाविद्या...
सात्रळ(वेबटीम)
संविधानाच्या गौरवदिनानिमित्त अहमदनगर येथीलस्नेहालय संचलित युवानिर्माण प्रकल्प आणि राज्यशास्त्र विभाग, पेमराज सारडा महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय संविधान करंडक पथनाट्य स्पर्धेत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ (ता. राहुरी) सांस्कृतिक विभाग पुरस्कृत ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ या शीर्षकाच्या पथनाट्यास द्वितीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह व पमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
पथनाट्याचे सादरीकरण विद्यार्थी कलावंत म्हणून रूपाली संजय घोलप, दिव्या गोरक्ष खळदकर, पल्लवी सुरेश ब्राह्मणे, प्रिया संदीप मोरे, गौरी विजय प्रधान, कोमल शास्त्री अंत्रे, मयूर पांडुरंग तुंबारे, नुकसान जमील पठाण, सारिका दत्तात्रय थेटे, अनिकेत संजय बेलकर, प्रशांत सुभाष खाटेकर यांनी केले. सात्रळ महाविद्यालयाचे सांस्कृतिक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री. भारत घोगरे, संस्थेचे डायरेक्टर एज्युकेशन तथा लोणी येथील विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डाॅ.) प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, डॉ. अनंत केदारे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत