राहूरीतील स्नेहसदन चर्च येथे महिला मेळावा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील स्नेहसदन चर्च येथे महिला मेळावा संपन्न

  राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील  स्नेहसदन चर्च येथे महिला मेळावाचे आयोजन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.मायकल राजा यांनी केले होते.या मेळाव्यासाठ...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी शहरातील  स्नेहसदन चर्च येथे महिला मेळावाचे आयोजन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.मायकल राजा यांनी केले होते.या मेळाव्यासाठी श्रीरामपूर येथील निर्मला ओहोळ ह्या मोठ्या संख्येने महिलाचे बचत गट व महिलासाठी विविध विषयावर मार्गददर्शन केले.


यावेळी त्यानी स्नेहसदन् मधील उपस्थित महिलांना चर्च मध्ये महिला मंडळ असणे बाबत व महिला सबळीकरण व महिला ह्य पुरुषा बरोबरीने अत्यंत उत्कृष्ट कार्य करू शकतात याबाबत अंत्यत अभ्यास पूर्ण व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले व सर्व उपस्तित महिलां प्रोत्साहीत केले.               


  याच वेळी ऍड. प्रकाश संसारे (वकील.व एन सी डी सी चे महाराष्ट्र  विभागाचे उपाध्यक्ष)यांनी महिला विषयक कायदे व महिलाचे सुरक्षा बाबत असणारे विविध कायदे.शाळेत जाणाऱ्या मुली, विवाहित महिला, घटस्पोटीत महिला, वयस्कर महिला यांना कायदे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच जन्म मृत्यू विवाह नोंदणी ही मुदतीच्या आत करणे बाबत आवर्जून सांगितले.                 फा माथु यांनी चर्चचे धार्मिक कार्यामध्ये महिलाचा सहभाग असणे बाबत मार्गदर्शन केले.               


       कार्यक्रमाचे मार्गदर्शक निर्मला ओहळ मॅडम व ऍड. प्रकाश संसारे यांचा सत्कार फा.मायकल राजा यांनी  केला.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे सौ ख्रिस्तींना बोर्डे यांनी केले. या मेळाव्या साठी मर्थाबाई मुन्तोडे परिघाबाई पवार‌ मनिषा मकासरे ज्योती जाधव  सह सडे, राहुरी,डिग्रस, वांबोरी,खडांबे,राहुरी स्टेशन परिसरातील महिला उपस्थित होत्या.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत