ऊस तोडणी कामगारांना नोंदीत कामगारांच्या सुविधा मिळाव्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऊस तोडणी कामगारांना नोंदीत कामगारांच्या सुविधा मिळाव्यात

  राहुरी(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात ऊस गाळपाला प्रारंभ झाल्यापासून ऊस तोडणी कामगारांचे दैन्य संपलेले नाही.अत्यंत हलाकीच्या परिस्थित...

 राहुरी(विशेष प्रतिनिधी)



महाराष्ट्र राज्यात ऊस गाळपाला प्रारंभ झाल्यापासून ऊस तोडणी कामगारांचे दैन्य संपलेले नाही.अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत ऊन ,वारा, पाऊस यांची पर्वा न करता साखर कारखान्यासाठी ऊस तोडण्याचे काम हा मजूर वर्ग पिढ्यानपिढ्या करीत आलेला आहे या ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणाकरिता शासनाकडे कोणतीही कल्याणकारी योजना नसल्याने अजूनही कित्येक पिढ्या त्यांचे जीवनमान उंचावण्याची शक्यता धुसर असल्याचे चित्र आहे.


 महाराष्ट्र राज्यात इमारत बांधकाम मजुरांना विविध योजनांच्या आधारे मिळणारे लाभ हे ऊस तोडणी कामगार मजुरांना मिळाले पाहिजेत.  याकरिता साखर आयुक्त, साखर संघ व राज्यातील साखर कारखानदार प्रयत्नशील असल्याचे दिसत नाहीत. नोंदणीकृत बांधकाम मजूरला विवाहासाठी तीस हजार रुपये अनुदान दिले जाते. मध्यान भोजन सुविधा त्यांना मिळते,तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ त्याचबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभातून सुरक्षा योजना शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते त्यांच्यासाठी मोफत सुरक्षा संच उपलब्ध आहे ऑगस्ट 2014 रोजी नोंदीत असलेल्या कामगारांना गरजेच्या वस्तू घेण्यासाठी प्रति कामगार तीन हजार रुपया अर्थसाह्य दिले जाते. याच बरोबर कामगारांच्या मुलांना पहिले ते सातवीपर्यंत 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास अडीच हजार रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते.


 या सर्व सुविधा नोंदीत बांधकाम कामगारांसाठी दिल्या जातात मात्र वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ऊस तोडणीचे काम करून स्वतःच्या मुलाबाळांना उसाच्या शेतात वाढवून उपजीविका करणाऱ्या ऊसतोड कामगारांना या सुविधा मिळत नाहीत.


ऊन ,वारा,पाऊस व कडाक्याच्या थंडीत देखील कोणतीही एक तक्रार न करता ऊस तोडणी कामगार पहाटे चारला बैल गाडीला जुंपून ऊसतोडणीसाठी तयार असतो लेकरा बाळांसह कडाक्याच्या थंडीत उसाच्या शेतात पोहोचलेला हा उसतोडीवाला पोटच्या गोळ्यांना शेकोटी करून देऊन आपल्या कामात व्यग्र होतो. आपल्या आसपास बिबट्याचा वावर आहे हे माहीत असून देखील त्याला पोटाची भूक शांत बसू देत नाही.


दोघा पती-पत्नीचे  सूर्योदयापूर्वी सुरू झालेले  ऊस तोडण्याचे काम सूर्यास्तानंतर थांबते,त्यांच्या लेकरांना व त्यांना मध्यान भोजन उपलब्ध नाही,मुलांसाठी शाळेची व्यवस्था नाही,कोणतेही सुरक्षा कवच नाही,कोणतेही अनुदान नाही, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊस तोडणी कामगारांसाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न केले होते मात्र आता तसे होताना दिसत नाही राज्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांची सरकारकडे अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे.


त्याच बरोबर  कामगार आयुक्त कार्यालय मार्फत त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी कोणी प्रयत्न केले गेले पाहिजे.  किमान बांधकाम मजुरांच्या धरतीवर ऊस तोडणी कामगारांना लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत