सात्रळ (वेबटीम) सात्रळ पंचक्रोशी व परिसरातील गावांचे श्रद्धास्थान असलेले सात्रळ येथील पुरातनकाळापासून प्रसिद्ध असलेल्या खंडोबा महाराज ...
सात्रळ (वेबटीम)
सात्रळ पंचक्रोशी व परिसरातील गावांचे श्रद्धास्थान असलेले सात्रळ येथील पुरातनकाळापासून प्रसिद्ध असलेल्या खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्टी निमित्त येथील किरण कडू मित्रमंडळा तर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वांग्याचे भरीत व रोडगा रुपी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
भरीत रोडग्याचा प्रसाद वाटपाची प्रथा किरण कडू मित्रमंडळा तर्फे गेली अनेक वर्ष राबविली जात असून मोठया संख्येने भाविक याचा लाभ घेत असून मंडळास धार्मिक भावना जपल्याबद्दल धन्यवाद देत आहेत.
या उपक्रमासाठी युवानेते किरण कडू यांच्या सह पत्रकार संभाजी कडू, उदयनराजे कडू, दत्तू पडघलमल, संदीप वाकचौरे, भरत वाकचौरे, साहेबराव कडू, विलास बलसाने, गणेश पुंड, गोपाल सूर्यवंशी, कैलास पडघलमल, बाबासाहेब शेजवळ, आकाश पडघलमल, गोकुळ मोरे, गनीभाई शेख आदी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत