सात्रळ(वेबटीम) सात्रळ पंचक्रोशी व परिसरातील आराध्य दैवत असलेल्या खंडोबा मंदिरात जातीय सलोखा जपल्याचे चित्र अनुभवत आहे. सुमारे 150 वर्...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ पंचक्रोशी व परिसरातील आराध्य दैवत असलेल्या खंडोबा मंदिरात जातीय सलोखा जपल्याचे चित्र अनुभवत आहे.
सुमारे 150 वर्षांपूर्वीपासून असलेले येथील खंडोबा मंदिराची देखभाल जेष्ठ नागरिक माजी सरपंच संभाजीराव चोरमुंगे परिवाराकडे असून खंडोबा मंदिरात सेवेकरी म्हणून मुस्लिम समाजाचे रज्जाकभाई शेख हे करत आहेत. उत्सव काळात मंदिरात तील सेवा कार्य, साफसफाई, भाविकांनी ठेविलेले नैवेध्य व्यवस्थित ठेवणे, गाभाऱ्यातील स्वछता राखणे तसेच दैनंदिन कामे रज्जाकभाई मोठ्या हिरारीने पार पडत आहेत. खंडोबा मंदिर सेवेकरी म्हणून ही त्यांची दुसरी पिढी असून या पूर्वी त्यांचे वडील ही सेवा देत. प्राचीन महत्व असलेल्या या खंडोबा मंदिरात दर वर्षी चोरमुंगे कुटुंबाकडून चैत्री पौर्णिमाला मोठी यात्रा भरते तसेच या दिवशी सकाळी खंडोबा महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा, तसेच नवरात्री उत्सव, चंपाषष्टी उत्सव असे अनेक धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहाने भाविकांच्या मोठया संख्येच्या उपस्तिथ साजरे केले जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत