राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परीसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्लेक्स येथील म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परीसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर श्रीरामपूर रोड येथील श्री.दत्त कॉम्लेक्स येथील मातोश्री हॉस्पिटल येथे उद्या बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी व निदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मातोश्री हॉस्पिटलचे डॉ.रवी घुगरकर यांनी दिली.
याबाबत माहिती देताना डॉ.घुगरकर म्हणाले की,गेल्या रविवारी मातोश्री हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला मात्र अद्यापही अनेकांची नेत्र तपासणी होणे बाकी असल्याने त्यांच्या आग्रहाखातर बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत अत्याधुनिक मशीन द्वारे नेत्र तपासणी होणार आहे.
तरी परिसरातील गरजू रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.रवी घुगरकर व मातोश्री हॉस्पिटल परिवाराकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६६०३३२५७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत