देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार पोलिस पथकाने महाराष्ट्र शासनाचे कोणतेही बिल प...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार पोलिस पथकाने महाराष्ट्र शासनाचे कोणतेही बिल पावती परवाना नसताना अवैधरित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेला तांदुळाचा ट्रक देवळाली -फॅक्टरी रोडवर सोमवारी राञी पकडला.माञ पकडलेल्या ट्रकवर गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल 24 तास लागले. उशिरा गुन्हा दाखल करण्या मागचे पोलिसांचे गौडबंगाल काय असावे याबाबत अनेक तर्क विर्तक काढले जात आहे.5 लाख 4 हजार रुपयांचा मालट्रकसह तांदुळ जप्त करुन राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा रोडवरून सोमवारी रात्री 9 वाजता एम एच 16 सीसी 4511 या क्रमांकाच्या ट्रकमधून महाराष्ट्र शासनाचे कोणतेही बिल पावती अथवा परवाना नसताना अवैधरित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने तांदुळाने भरलेला ट्रक जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा पो.हे.काँ.सचिन ताजणे,नदीम शेख,शशिकांत वाघमारे यांनी देवळाली प्रवरा राहुरी फँक्टरी दरम्यान हा मालट्रक थांबवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदुळ असल्याचे शंका व्यक्त करत मालट्रक थेटे राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आला. 30 लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह 5 लाख 4 हजार रुपयांचा व 25 हजार 555 किलो वजनाचा तांदूळ पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात आणला. तब्बल 24 तासा नंतर गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पो.हे.काँ.सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा येथील सुनिल चांगदेव गल्हे (वय 43 वर्ष), उध्दव अर्जुन खाडे (वय 43 वर्षे धंदा चालक रा.दरखवाडी ता जामखेड जि अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर दबाव टाकणारा वरीष्ठ अधिकारी कोण?
पोलिसांवर वरीष्ठ पोलिसांकडून दबाव असल्याने या ट्रकवर कारवाई होत नसल्याची कुनकुन राहुरी पोलीस स्थानकाच्या परिसरात ऐकायला मिळाली. त्यामुळे या ट्रकबाबत गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती. नेमके काय घडणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.अखेर तब्बल 24 तासा नंतर या मालट्रक चालकासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी पोलिसांवर दबाव आणणारे वरीष्ठ पोलिस अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महसुल व पोलिसांकडून समांतर तपास;तहसिलदार शेख
राहुरी हद्दीतील तांदूळाने भरलेला ट्रक पोलिसांना पकडला आहे. संबंधित तांदूळ हे रेशन दुकानाचे आहे का? शासकीय पोते नसल्याने त्याबाबत गौडबांगल काय? काळ्या बाजारात तांदळ विक्री करणाऱ्यांची टोळी असेल तर त्याचा सविस्तर पर्दाफाश होईल. महसूल व पोलिस प्रशासन एकत्ररित्या समांतर चौकशी करीत असल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.
तांदुळाच्या बदल्यात गहु, ज्वारी, बाजरी..
रेशनवर दोन रुपये किलो प्रमाणे प्रति माणसी 3 किलो,तर मोफत प्रति माणसी 4 किलो असे प्रति माणसी 7 किलो तांदुळ मिळतो.एका कुटुंबास साधारण एका महिण्यास 2 किलो तांदुळ पुरत असल्याने जादा होणारा तांदुळ देवून त्या बदल्यात गहु, ज्वारी, बाजरी घेऊन कुटुंबाची धान्याची गरज भागविली जाते.पकडलेला तांदुळ समवेत एकही शासकीय गोणी सापडली नसल्याने हा तांदुळ रेशनचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
....ते दोन पाकीटे कोणासाठी?
देवळाली प्रवरात रेशनचा तांदुळ छोट्या दुकानदारापासुन ते मोठ्या व्यापाऱ्या पर्यत खरेदी करणारांची संख्या मोठी असली तरी रेशनचा तांदुळ लाभार्थी कडून विकत घेतला जातो. रेशनचा तांदुळ विकत घेताना पोलिसांचा कोणताही ञास होवू नये म्हणून रेशनचा तांदुळ खरेदी करणारे व्यापारी एकञित राहुरी व देवळाली प्रवरासाठी ते दोन जड वजनाचे पाकीटे कोणासाठी केले जात होते. अशी चर्चा परिसरात केली जात होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत