(राहुरी : महेश कासार ) इवलेसे रोप लावले दारी त्याचा वेलु गेला गगनावरी, या संतांच्या अंभगाप्रमाणे चिंदबरस्वरुप प.पु गुरुवर्य उमाकांत कुलकर्...
(राहुरी : महेश कासार )
इवलेसे रोप लावले दारी त्याचा वेलु गेला गगनावरी, या संतांच्या अंभगाप्रमाणे चिंदबरस्वरुप प.पु गुरुवर्य उमाकांत कुलकर्णी (भाऊ) यांनी चिदंबर सेवा समिती च्या माध्यमातून हजारो कुटुंबांना भक्तीमार्गकड नेण्याचे काम केले प पु. भाऊंना चिंदबर महास्वामीचा कृपा आशिर्वाद लाभल्याने त्यांच्या हातुन हे महान कार्य घडले, असे प्रतिपादन ह.,भ. प डॉ कल्पेश महाराज भागवत देवपुर यांनी केले
चिदंबर महास्वामी जन्मोत्सवा निमित्ताने गिरगुणे वस्तीवर आयोजित काल्याच्या किर्तन प्रसंगी ते बोलत होते डॉ कल्पेश महाराज पुढे म्हणाले, उमाकांतभाऊनी चिंदबर सेवा समिती च्या माध्यमातून मोठं समाज कार्य केले आहे. माणसांत परिवर्तन घडवून आणणे हे सोपे काम नाही, आपल्या घरातील माणसं ,आपल ऐकत नाही इथे मात्र येणारा प्रत्येक चिदंबर भक्त निःस्पृह भावनेने ईश्वर सेवा समजुन काम करतात . हेच चिदंबर सेवा समिती चे मोठे यश आहे
महाआरती व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत