श्रीरामपूर(वेबटीम) : गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने शासनाला सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्याने अनेक दशकांपासून राहणा...
श्रीरामपूर(वेबटीम)
: गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने शासनाला सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्याने अनेक दशकांपासून राहणाऱ्या मुळ भारतीय असलेल्या मात्र हक्काचे अन्न,वस्र, निवारा या मुलभूत गरजा भागविण्यासाठी ही बहुसंख्य कुटुंबे शासनाच्या पडीत, गायरान, खडकाळ, डोंगराळ भागात राहून कष्ट करून उपजीवाका भागवीत आहे. यावरील शासनाने कारवाही थांबवावी या विरोधात बहुजन समाज पक्षाचे शिर्डी लोकसभा प्रभारी प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तहसीलदार यांना वतीने शासनाला निवेदन दिले. निवेदन प्रभारी महसूल नायब तहसीलदार अभया राजवळ यांनी स्विकारले.
निवेदनात म्हंटले आहे की, अजूनही बहुसंख्य लोकांना हक्काचे घर नाही. कसण्यासाठी हक्काचे जमीन नाही. ही सर्व कुटुंबे हातावर पोट भरणारी असून मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका व गरजा भागवीत आहेत. अशा निराश्रित, भूमिहीन, मूलनिवासी भारतीय नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन मा. उच्च न्यायालयाने पारित केलेला आदेशावर महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांविरोधात कठोर भूमिका घेऊ नये. तसेच गायरानावरील अतिक्रमित लोकांवरील कारवाई तात्काळ थांबवावी. या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व अन्न,वस्र, निवारा या मुलभूत गरजा भागविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा या भूमिहीन नागरिकांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा अहिरे यांनी दिला आहे.
यावेळी बसपाचे राहाता विधानसभा अध्यक्ष अँड. एस. डी. बोधक, श्रीरामपूर विधानसभा सचिव ताराचंद त्रिभुवन, श्रीरामपुर शहर सदस्य विजय मटाले, शिवाजी दांडगे, सामाजिक कार्यकर्ते अनिल रणदिवे, विजय उमप, दिलीप जगताप, शहर संघटक कृष्ण कदम, सीताराम जावरे, शाखा अध्यक्षा लतीफा शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष कल्पना त्रिभुवन, मीना सोनवणे, संजय वाहूळ, राहुल पुजारी, पायल सोलंकी, सीमाताई कुलथे, निशांत पाटील, रुपेश चंदनशिव, संतोष अमोलिक, शुभांगी मिसळ, सुनिता जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी - श्रीरामपूर : गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांवरील कारवाही शासनाने तात्काळ थांबवावी यासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देताना प्रकाश अहिरे आणि पदाधिकारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत